
हस्तमैथुन आरोग्यासाठी चांगलं की वाईट? (Is Masturbation Ggood or Bad) हा प्रश्न निराकरण होत नाही तोपर्यंत वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेकांना पडतो. पण, युरोपियन युरोलॉजीने प्रकाशित केलेल्या वैज्ञानिक संशोधनानुसार सांगायचे तर संशोधकांनीच दावा केला आहे की, हस्तमैथुन (Masturbation) चांगले आहे. होय, संशोधक दावा करतात की, जर तुम्हाला प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल तर तुम्हाला नियमितपणे हस्तमैथुन (Masturbating is Good for Men) करणे प्रभावकारक आहे. ज्यात पुरुषांनी महिन्यातून किमान 21 वेळा हस्तमैथुन करणे आरोग्यदाई मानले आहे.
संशोधक आपल्या अभ्यासात दावा करतात की, प्रोस्टेट कॅन्सरने ग्रस्त होण्यापासून अनेक लोक हस्तमैथुन केल्याने वाचू शकतात. संशोधकांनी हस्तमैथुन विषयावर सुरु ठेवलेले संशोधन 18 वर्षांच्या कालावधीत चालले. या संशोधनात संशोधकांच्या टीमने निर्दिष्ट केलेल्या लोकसंख्येपैकी किती लोक प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त आहेत याचा मागोवा घेतला. संपूर्ण अभ्यासादरम्यान, पुरुषांचे मूल्यांकन तीन वेगवेगळ्या वेळी करण्यात आले. अभ्यासाच्या निष्कर्षात असे दिसून आले आहे की जे पुरुष वारंवार वीर्यपतन करतात त्यांना प्रोस्टेट कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते. (हेही वाचा, Anal Sex करण्याची चटक लागलेल्या व्यक्तीची हत्या; घटनास्थळावरुन सेक्स स्प्रे, टॅबलेट, तेल बॉटल आणि दांडके जप्त)
दरम्यान, पुरुषांमध्ये वारंवार स्खलन झाल्यामुळे त्यांना प्रोस्टेटमध्ये तयार होणारे जीवाणू आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तथापि, तज्ञांनी हे देखील अधोरेखित केले की हस्तमैथुन हा प्रोस्टेट कर्करोगापासून दूर ठेवण्याचा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे हे संशोधन प्रत्येकासाठी लागू होईलच असे नाही. अति प्रामाणात हस्तमैथुन केल्याने त्याचे काही विपरीत परिणामही एखाद्याच्या आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टी काळजीपूर्वकच करा असेही संशोधक सांगतात.