Keniya News: केनियात भीषण स्फोट, 2 जण ठार, 165 लोक जखमी
Keniya Cylinder Explosion PC Twitter

Keniya News: केनियातील नैरोबी येथे भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आणि 165 लोक जखमी झाले आहे. एम्बाकीस येथील कबनसोराजवळी केंटेनर्स कंपनी लिमिटेडमध्ये हा स्फोट झाला आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्याने परिसरातील लोक हैराण झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.( हेही वाचा- चेंबूर मध्ये Siddharth Colony मध्ये सिलेंडरचा ब्लास्ट; 9 जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि परिसरातील १६५ जण जखमी झाले आहे. जखमी लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात अग्निशमन इंजिनांसह बचाव कार्य सुरू आहे. स्थानिकांनी कॅमेऱ्यात हे भयावह दृश्य कैद केले आहे.अग्निशामक दल, स्थानिक अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन पथके आग आटोक्यात आणण्यासाठी आणि गरजूंना त्वरीत मदत देण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सर्वत्र आग आणि धुराचे लोट पसरलेले आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्फोटांचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि  किती नुकसान झाले हे देखील अद्याप समजू शकलेले नाही.