Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Australia: ऑस्ट्रेलियातील सिडनी (Sydney) येथे एका भारतीय वंशाच्या पुरुषावर बलात्कार आणि इतर गुन्ह्यांच्या 13 प्रकरणांमध्ये खटला सुरू आहे. डेली मेलने अलीकडेच सिडनीमधील भारतीय समुदायामध्ये प्रसिद्ध असलेल्या बालेश धनखर (Balesh Dhankhar) याने केलेल्या कथित गुन्ह्यांचे तपशील प्रकाशित केले. धनखर यांनी कोरियन महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला.

रिपोर्टनुसार, बालेश धनखर यांनी खास कोरियन वंशाच्या महिलांना टार्गेट केले. धनखरवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या 13 पीडितांपैकी पाच कोरियातील आहेत. या महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी बालेश धनखर यांनी नोकरीची बनावट जाहिरात दिली होती. मनी कंट्रोलने डेली मेलच्या हवाल्याने म्हटले आहे की, धनखरने कोरियनमधून इंग्रजीमध्ये भाषांतर करू शकतील अशा महिलांना कामावर ठेवण्याची ऑफर दिली. (हेही वाचा - Aaditya Thackeray, BJP Yuva Morcha चे Madhukeshwar Desai यांचा World Economic Forum  च्या  Young Global Leaders list मध्ये समावेश)

रिपोर्टनुसार, आरोपी धनखर हा सिडनीतील हिल्टन हॉटेल बारमध्ये महिलांना अपार्टमेंटजवळ बोलवायचा आणि महिलांच्या पेयांमध्ये रोहिप्नॉल किंवा झोपेच्या गोळ्या मिसळून त्यांना अपार्टमेंटमध्ये घेऊन जायचा. यानंतर तो आपल्या सदनिकेत सहकाऱ्यांवर बलात्कार करायचा. अहवालात असे म्हटले आहे की, बालेश धनखर यांच्याकडे छुप्या कॅमेराने सुसज्ज एक अलार्म घड्याळ होते, जे त्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्याला जोडले होते. त्याने हे घड्याळ सापळ्यात पडलेल्या सर्व महिलांचे लैंगिक अत्याचार रेकॉर्ड करण्यासाठी वापरले. त्याच्या ताब्यातून काही फुटेज जप्त करण्यात आले असून त्यावरून सर्व काम संमतीने झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, खोलीत व्हिडीओ शूट केल्याची माहिती पीडित महिलांना नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मनी कंट्रोलच्या अहवालात म्हटले आहे की, पोलिसांनी बालेश धनखरच्या कोरियन महिलांसोबतच्या लैंगिक संबंधांच्या 47 रेकॉर्डिंग जप्त केल्या आहेत. त्याच्या जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या या व्हिडिओंमध्ये अनेक महिला बेशुद्ध आणि निवांत अवस्थेत असल्याचे दिसत आहे. भारतीय वंशाच्या बालेश धनखरवर जानेवारी ते ऑक्टोबर 2028 या कालावधीत 13 बलात्काराचे आरोप असल्याची माहिती आहे. त्याच्यावरील आरोपांमध्ये संमतीशिवाय 17 आक्षेपार्ह रेकॉर्डिंग आणि अश्लीलतेच्या कायद्याच्या विरोधात ड्रग्ज देण्याच्या 6 प्रकरणांचा समावेश आहे.