आयरिश लेखिका एॅना बर्न 'मॅन बुकर अवॉर्ड'ने सन्मानित
फोटो सौजन्य - गुगल

पुस्तकांच्या दुनियेतील सर्वांत मानाचा समजला जाणारा 'मॅन बुकर अवॉर्ड 2018' चा मान आयर्लंडची लेखिका एॅना बर्न हिला देण्यात आला आहे. तसेच एनाला तिच्या 'मिल्कमॅन' या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एॅना बर्नला 'मिल्कमॅन' या पुस्तकाता तिने शारीरिक आणि मानसिक तत्वाच्या आधावर या पुस्तकाची कथा लिहीली आहे. तर पुरस्कार देणाऱ्या प्रमुखांनी या पुस्तकाची प्रशंसा केली आहे. एॅनाची प्रशंसा करत, 'मिल्कमॅन हे पुस्तक एवढे सुंदर आहे की, त्यामध्ये या लेखिकेच्या आयुष्यातील दुखा:ची कहाणी सहज हृदयाला भावणारी आहे' असं प्रमुखांनी सांगितले. त्यामुळेच एॅना हिचे या पुरस्कारासाठी नाव निवडण्यात आले. तर एॅना हिची पुस्तके समाजाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्यास भाग पाडतील अशी आहेत.

यापूर्वीसुद्धा एॅना हिने 'नो बोन्स' आणि 'लिटिल कंन्सट्रक्शन' ही दोन पुस्तके लिहिली आहेत. तर 2011 मध्ये विनिफ्रेड अवॉर्डनेसुद्धा एॅना हिला गौरवण्यात आले आहे.