Maldives Tourism: 'बॉयकॉट ट्रेंड'चा मालदीव पर्यटनाला मोठा फटका, आकडेवारी आली समोर
Maldive (Image Credit - Pixabay)

भारत आणि मालदीव (India Maldive Row) यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून खराब असून याचा फटका आता मालदिवला (Maldives Tourism) बसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. यावेळा बायकॉट मालदीव (Boycott Maldive) असा हॅशटॅग देखील सोशल मीडियावर चालवण्यात आला होता. अनेकांनी मालदीवच्या ट्रीप कॅन्सल केल्याचे देखील समोर आले होते.  (हेही वाचा - No Confidence Motion Against Maldives Govt: भारत विरोधी टिप्पणीमुळे मालदीव सरकारविरोधात नाराजी, विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची मागणी)

दोन्ही देशात वाढलेल्या तणावाचा फटका मालदीवच्या पर्यटन विभागाला बसल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवच्या पर्यटनात भारताचा वाटा घसरला आहे. मागच्या काही दिवसात मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकडेवारीत मोठा फरक पडला आहे. मालदीवला सर्वाधिक संख्येने भेट देणाऱ्यांमध्ये भारतीयांचा क्रमांक तिसरा होता, तो अवघ्या तीन आठवड्यांच्या काळात खाली घसरून पाचवा झाला आहे. मालदीव पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.

2023 च्या आकडेवारीनुसार 11 टक्के पर्यटक हे भारतीय होते. मात्र नुकतेच झालेल्या पंतप्रधान मोदींबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर या पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मालदीवच्या पर्यटन विभागाच्या वेबसाइटनुसार, 2024 च्या सुरुवातीला भारत 7.1 टक्के मार्केट शेअरसह पर्यटनात योगदान देणारा तिसरा सर्वात मोठा वाटेकरी होता. तर चीन पहिल्या 10च्या यादीतही नव्हता. आता चीन आणि ब्रिटनने भारताला मागे टाकून अनुक्रमे पहिल्या 10 च्या यादीत तिसरे आणि चौथे स्थान मिळवले.