Maldives Foreign Minister Praises India In Hindi Video: कोरोना काळात भारताची मालदीव ला $250 मिलियनची मदत, परराष्ट्र मंत्री अबदुल्ला शाहीद यांनी हिंदीत मानले आभार
Maldives Foreign Minister Abdulla Shahid (Photo Credits: ANI)

Maldives Foreign Minister Abdulla Shahid Praises India In Hindi: कोरोना (Coronavirus)  सारखं मोठंं संकट जगावर येताच सर्व देशांंना आपल्या सीमा सुद्धा बंंद कराव्या लागल्या पण तरीही मनाच्या सीमा उघड्या ठेवुन भारताने अलिकडेच आपला मित्र देश मालदीव ला 250 मिलियन USD ची आर्थिक मदत केली होती. याच मदतीसाठी आभार मानत आज मालदीव चे परराष्ट्र मंंत्री अबदुल्ला शाहीद यांंनी खास हिंंदी मध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कोरोना संकटातही भारत आपला महान मित्र ठरला आहे, भारताने आपली मैत्री निभावली आहे अशा भावना शाहीद यांंनी बोलुन दाखवल्या आहेत. Global COVID-19 Update: जगात कोरोना व्हायरसचा उद्रेक! एकूण 3.6 कोटी कोरोना बाधित; 955,440 रुग्णांचा मृत्यू

अबदुल्ला शाहीद यांंनी व्हिडिओ मध्ये म्हंंटलंय की, "आज पुर्ण जग कोरोना सारख्या शत्रु सोबत लढत आहे. असा शत्रु, ज्याला आपण पाहु शकत नाही, हा शत्रु इतका मोठा धोका आहे की ज्याकडे लक्ष न देणे सुद्धा शक्य नाही, या महामारीने जगाच्या हवाई सेवा आणि एकुणच सीमा बंंद केल्या आहेत, जगात अनेक मोठे मोठे निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत, मात्र आमच्या मित्रांंनी हे दाखवुन दिलंय की ही महामारी त्यांंच्या मनाचे दार बंंद करु शकणार नाही, भारत आमचा महान मित्र आहे."

ANI ट्विट

दरम्यान, मुख्यतः पर्यटनावर अर्थव्यवस्था अवलंबुन असल्याने मालदीव ची आर्थिक स्थिती कोरोनामुळे मोडकळीस आली आहे. अशा परिस्थितीत मालदीव मधील भारतीय दुतावासाने 250 मिलियन USD ची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामुळे मालदीव मधील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करता येतील अशी आशा भारतीय दुतावासाने व्यक्त केली होती.