Low-Paid Jobs in Canada: कॅनडामध्ये (Canada) मोठ्या संख्येने भारतीय राहतात. दररोज अनेक भारतीय विद्यार्थी-नोकरदार कॅनडाच्या व्हिजासाठी अर्ज करतात. अशा परिस्थितीत तेथील सरकारने कोणताही निर्णय घेतला, तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी सोमवारी एक मोठी घोषणा केली. ट्रूडो यांनी कॅनडामध्ये तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या परदेशींची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिन ट्रुडोच्या या निर्णयाचा परिणाम कॅनडामध्ये कमी पगारावर काम करणाऱ्या आणि तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या लाखो परदेशी नागरिकांवर होणार आहे. कॅनडात राहणाऱ्या परदेशी लोकांमध्ये भारतीय शीख आणि विद्यार्थी सर्वाधिक आहेत. यातील अनेक लोक तेथे राहून छोटे व्यवसाय आणि कंपन्यांमध्ये काम करतात.
आपल्या निर्णयाची माहिती देताना ट्रुडो म्हणतात, ‘आम्ही कॅनडामध्ये येणाऱ्या कमी पगाराच्या तात्पुरत्या परदेशी कामगारांची संख्या कमी करत आहोत. श्रमिक बाजारपेठ खूप बदलली आहे. आता आमच्या कंपन्यांनी कॅनेडियन कामगार आणि तरुणांना अधिकाधिक नोकऱ्या देण्याची वेळ आली आहे.’
जस्टिन ट्रुडो यांचा भारतीयांना मोठा झटका-
We’re reducing the number of low-wage, temporary foreign workers in Canada.
The labour market has changed. Now is the time for our businesses to invest in Canadian workers and youth.
— Justin Trudeau (@JustinTrudeau) August 26, 2024
या सर्व प्रकारामुळे ट्रुडो यांना आता कॅनडामध्ये तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या परदेशी लोकांची संख्या कमी करण्याची घोषणा करावी लागली. कॅनडामध्ये स्थानिक लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्याबाबत चर्चा झाली आहे. जेणेकरून कॅनडातील लोकांना जास्तीत जास्त रोजगाराचा लाभ मिळू शकेल. (हेही वाचा: Right To Disconnect: कामावरून घरी परतल्यावर बॉसचा कॉल घेणं कर्मचाऱ्यावर बंधनकारक नाही; ऑस्ट्रेलियातील कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष अधिकार, वाचा सविस्तर)
सरकारच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी बेरोजगारीचा दर सहा टक्के किंवा त्याहून अधिक आहे अशा ठिकाणी कमी पगाराच्या परदेशी कामगारांना काम दिले जाणार नाही. मात्र, कृषी, अन्न आणि मत्स्य प्रक्रिया आणि आरोग्य सेवा यासारख्या अन्न सुरक्षा क्षेत्रांमध्ये अजूनही दिलासा आहे, कारण येथे कामगारांची कमतरता आहे. दरम्यान, ट्रुडो यांच्या या निर्णयाला तज्ज्ञांकडून राजकारणाशी जोडले जात आहे. या निर्णयामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या संख्येने वापरकर्ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अनेक कॅनेडियन एक्स वापरकर्त्यांनी त्यांना आतापर्यंतचे सर्वात वाईट पंतप्रधान म्हटले आहे.