विजय माल्ल्या यांना UK High Court चा दणका, लंडनच्या आलिशान घरातूनही बेघर होणार माल्ल्या
विजय माल्या Photo Credit-PTI)

भारतीय बँकांचे हजारो कोटी बुडवून लंडनला पळून गेलेल्या विजय माल्ल्याला(Vijay Mallya) UK कोर्टानेही दणका दिला आहे. कोर्ट ने यूबीएस बँकेच्या बाजूने निर्णय देत लंडनमधील अलिशान घरावर जप्ती मिळवली आहे. त्यामुळे माल्ल्याचे लंडनमधील घरदेखील त्याच्या हातातून गेले आहे. यूबीएस बँकेविरोधात विजय मल्ल्याने केलेला युक्तीवाद यूके उच्च न्यायालयाने (UK High Court) फेटाळला आहे.

विजय मल्ल्याच्या रोझ कॅपिटल वेंचर्स कंपनीने कॉर्नवॉल टेरेस येथील माल्ल्याचे आलिशान घर गहाण ठेवून यूबीएस बँकेकडून 20.04 मिलियन पाऊंडचे कर्ज घेतले होते. मात्र वेळेत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे यूबीएस बँकेला या निवासस्थानावर जप्ती आणायची आहे. या खटल्याची अंतिम सुनावणी मे 2019  मध्ये होणार आहे.

भारतातून लंडनमध्ये पळालेले विजय मल्ल्या जामिनावर आहेत. लवकरच भारताकडे विजय माल्ल्याचे प्रत्यार्पण करण्याच्या मागणीसाठी यूके न्यायालयात खटला सुरु आहे. भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप विजय माल्ल्यावर आहे. लंडनमधील न्यायालयात काही दिवसातच भारतामध्ये प्रत्यार्पणासाठी खटल्यावर निकाल देण्यात येणार आहे.