Jeffty Bezos and Bill Gates (Photo Credits: Getty Images)

List of Richest Person as of January 1, 2020: आज ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 2020 या वर्षाची सुरूवात झाली आहे. यंदा लीप इयर असल्याने हे वर्ष 366 दिवसांचे आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देताना अनेकांनी येत्या वर्षात आर्थिक भरभराट होवो, अशा देखील शुभेच्छा दिल्या असतील. पण आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहा जगात कोण आहे सर्वात श्रीमंत? अमेरिका, फ्रांस, मेक्सिको, भारत अशा जगभरात विविध क्षेत्रात काम करणार्‍या कोणत्या व्यक्तीकडे पहा किती रूपयांचा आज 2020 च्या पहिल्या दिवशी आहे?

दरम्यान जगभरात सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत अ‍ॅमेझॉनचा सीईओ Jeff Bezos,मायक्रोसॉफ़्ट चे सह संस्थापक Bill Gates आणि Bernard Arnault,उद्योगपती Warren Buffett आणि फेसबूकचा मालक Mark Zuckerberg यांचा क्रमांक लागतो. तर टॉप 15 श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचा 14 वा क्रमांक लागतो. आजच्या दिवसाला मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 58.6 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. तब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती.

जगातील टॉप 5 श्रीमंत व्यक्ती आणि त्यांची संपत्ती 

  1. Jeff Bezos (115 बिलियन डॉलर)
  2. Bill Gates (113 बिलियन डॉलर)
  3. Bernard Arnault (105 बिलियन डॉलर)
  4. Warren Buffett (89.3 बिलियन डॉलर)
  5. Mark Zuckerberg (78.4 बिलियन डॉलर)

'ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स' ही संस्था जगातील टॉप 500 श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीचा लेखाजोखा जाहीर करते. न्यू यॉर्कमधील अमेरिकी शेअर बाजार बंद झाल्यानंतर धनाड्यांच्या संपत्तीचे आकडे अपडेट केले जातात. त्यानुसार नियमित यादी जाहीर केली जाते. अब्जाधीशांच्या यादीमध्ये भारतीयांमध्ये मुकेश अंबानी पाठोपाठ 65 व्या स्थानी विप्रो लिमिटेडचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती सुमारे 18.3 बिलियन डॉलर इतकी आहे.