LG मोबाइल फोन वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! कंपनी स्मार्टफोन व्यवसाय बंद करणार
LG (PC - Twitter)

दक्षिण कोरियाची सुप्रसिद्ध कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG) च्या मोबाइल वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एलजी आता स्मार्टफोन व्यवसाय बंद (LG Smartphone Business) करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एलजीच्या संचालक मंडळाने यापूर्वीचं मोबाइल फोनचा व्यवसाय बंद ठेवण्यास परवानगी दिली होती. स्मार्टफोनच्या व्यवसायात कंपनीला नुकसान झाले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एलजी आता आपल्या विभागातील कर्मचार्‍यांना स्मार्टफोन विभागातून इतर युनिट्समध्ये ट्रासफर करणार आहे. या महत्तवपूर्ण निर्णयानंतर एलजी आपला इतर व्यवसाय आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

एलजीने आतापर्यंत अगदी नवीन तंत्रज्ञानासह बाजारात उत्पादने आणले. मात्र, स्वस्त चिनी मोबाइल कंपन्यांच्या किंमतीपुढे एलजीचे उत्पादने व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकले नाहीत. एलजी कंपनीला सध्या ज्या व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळत आहे, त्या व्यवसायावर कंपनी अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. यात इलेक्ट्रिक वाहन घटक, कनेक्टेड डिव्हाइस, स्मार्ट होम्स, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि बिजनेस टु बिजनेस यांचा समावेश आहे. (वाचा - Amazon Drivers Urinate in Bottles: अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर चक्क बाटल्यांमध्ये लघुशंका करण्याची वेळ; कंपनीने मागितली माफी)

कंपनी व्यवसाय भागीदारांसह काम करणार -

अहवालानुसार, सध्याचा एलजी फोन इन्वेंट्री विक्रीसाठी उपलब्ध असतील. एलजी वेळोवेळी विद्यमान मोबाइल उत्पादनांच्या ग्राहकांना सेवा सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट प्रदान करेल. यात प्रदेशानुसार बदल असू ृ शकतात. मोबाइल फोन व्यवसाय बंद करताना एलजी पुरवठादार आणि व्यवसाय भागीदारांसह एकत्र काम करेल.

रिपोर्टनुसार, एलजी आपल्या मोबाइल तज्ञाचा फायदा घेत राहणार आहे. कंपनी गतिशीलतेशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत करेल. जसे की 6 जी. जेणेकरून इतर व्यवसायिक क्षेत्रांमध्ये स्पर्धा आणखी मजबूत होईल. एलजीच्या दोन दशकांच्या मोबाइल व्यवसाय दरम्यान विकसित केलेली मूलभूत तंत्रज्ञान देखील कायम ठेवणार आहे. हे तंत्रज्ञान विद्यमान आणि भविष्यातील उत्पादनांवर लागू केले जाईल. मोबाइल फोन व्यवसाय बंद करण्याची प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असे सांगितले गेले आहे की, एलजी लवकरच आपला मोबाइल फोनचा व्यवसायाची विक्री करण्याऐवजी बंद करेल.