Blast In Pakistan (Photo Credit - Twitter)

पाकिस्तानातील (Pakistan) उत्तरेकडील सियालकोट (Sialkot) शहरात रविवारी मोठा स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. स्फोटाचा (Blast in Sialkot) आवाज इतका मोठा होता की पंजाब प्रांतातील कॅन्टोन्मेंट परिसरातही तो ऐकू आला. मिळालेल्या माहितीनुसार "उत्तर पाकिस्तानमधील सियालकोट लष्करी तळावर (Sialkot military base Blast) अनेक स्फोट झाले आहेत. हे दारुगोळा साठवण क्षेत्र असल्याचे प्राथमिक संकेत आहेत. स्फोटानंतर मोठी आग जळताना दिसत आहे. स्फोटामागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, यापूर्वीच्या घटनांमध्ये बलुच बंडखोरांनी लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या सियालकोट लष्करी तळावर बॉम्बस्फोट झाले ते मुख्य शहराला लागून असलेल्या सियालकोट कॅंट परिसरात येते.

सियालकोट कँट क्षेत्र हा पाकिस्तानमधील सर्वात जुना आणि महत्त्वाचा छावणी क्षेत्र आहे. 1852 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीने त्याची स्थापना केली होती. त्याचबरोबर स्फोटानंतरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या व्हिडिओंमध्ये लष्करी तळाच्या वरच्या भागातून ज्वाला आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. (हे देखील वाचा: Pakistan Political Crisis: 'इमरान खानने राजीनामा द्यावा, तरच पाकिस्तानातील राजकीय संकट संपेल', PTI संस्थापकाचा सल्ला)

Tweet

इम्रान खान सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत

ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत. देशाच्या संसदेत दोन विरोधी पक्षांनी त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इम्रान खान यांना त्यांच्याच सत्ताधारी आघाडीत बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.