Viral Snake Video : अंगणात खेळत असलेल्या लहान मुलाचा पाठलाग करत किंग कोब्राचा घरात घुसण्याचा प्रयत्न

लहान मुलाचा पाठलाग करुन घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारा एक भल्यामोेठ्या किंग कोब्राचा (King Cobra) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, सुमारे दोन मीटर लांबीचा विषारी साप (Snake) व्हिएतनाममधील (Vietnam) घरासमोरच्या अंगणात एका मुलाकडे वेगाने सरकताना दिसत आहे. साप घरात शिरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातून अनेकांची चांगलीच भांबेरी उडाली आहे. साप म्हटलं की सर्वांनाच धडकी भरते. परंतू जेव्हा एखादा साप पाठलाग करत घरात शिरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नक्की काय परिस्थिती झाली असेल त्यांची याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

हा व्हिडिओ (Viral Video) अलीकडेच शहरातील चर्चेचा विषय बनला आहे. जेथे मुलगा अंगणात खेळत आहे. तर आजोबा अगदी त्याच्या मागे उभे आहेत. हा साप पहिल्यांदाच आजोबाच्या दिसण्यात येतो. परंतु आजोबांची प्रकृती स्थिर वाटत नाही आहे.  म्हणून त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याच्या जवळ असलेले त्याचे वडील मुलाच्या बचावासाठी धावले. आजोबा साप पाहत असताना वडिलांनी ताबडतोब मुलाला उचलले आणि घरात नेले.

व्हिडिओमध्ये आजोबा आपल्या मुलाचा आणि नातवंडाचा पाठलाग करत असलेल्या सापाला बघून घरात प्रवेश करतात. मुख्य काचेच्या दारामध्ये आजोबा प्रवेश करण्यापूर्वीच साप त्यांच्या अगदी जवळ होता. आवारातील विविध गोष्टी असूनही सापाची गती मुलाकडे वाढत होती. तो साप मुलाकडेच तीव्र गतीने जात होता. या धक्कादायक घटनेवर कारवाई करत मुलाला आत घेऊन जाणारे वडील काचेचा दरवाजा बंद करण्यासाठी परत आले. समोरच्या अंगणात विखुरलेली खेळणी आणि इतर वस्तूंच्या सहाय्याने सापाने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही.

बंद दरवाजाखाली साप देखील डोकावताना दिसला आहे. मात्र जागा खूपच लहान असल्याने आत जाऊ शकला नाही. काही वेळा प्रयत्न केल्यावर तो परत समोरच्या आवारातून बाहेर पडताना दिसत आहे. जेव्हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला तेव्हापासून त्याला लोकांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. ज्यात सर्वजण मुलाच्या आणि कुटूंबाच्या पूर्णपणे नशिबाबद्दल बोलत होते. तर इतरांना सापाच्या वेग आणि वेगांवर विश्वासच बसत नव्हता.