काबूल: लग्नसंमारंभात झालेल्या बॉम्बस्फोटात 40 जणांचा मृत्यू
Representational Image (Photo Credits: File Photo)

काबुल (Kabul) येथे शनिवारी (17 ऑगस्ट) रात्री एका लग्नसमारंभात बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात 40 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 100 पेक्षा अधिक लोग जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुबई शहरातील एका हॉलमध्ये लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला हजारोपेक्षा अधिक मंडळींनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या स्फोटाची तीव्रता एवढी अधिक होती की 40 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र समारंभावेळी झालेला बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला आहे की, अजून काही वेगळे कारण यापाठी आहे हे स्पष्ट झालेले नाही.(कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तानचा जळफळाट, भारतीय जाहिरातींवर घातली बंदी)

मीडियाने गृह मंत्रालयाच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. लग्नसमारंभ सुरु असताना शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. बॉम्बस्फोटात मृत झालेल्यांमध्ये लहान मुलांची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.