Justin Trudeau Diwali Celebrations: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दीप प्रज्वलित करून साजरी केली दिवाळी; या खास प्रसंगी दिल्या शुभेच्छा (See Photos)
Justin Trudeau lights candle on Diwali 2020 (Photo Credits: Twitter)

आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळीला (Diwali 2020) सुरुवात झाली. दिवाळी हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. जगाच्या पाठीवर जिथे कुठे भारतीय हिंदू आहेत तिथे सर्वत्र दिवाळी साजरी केली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये इतर धर्माचे लोकही हा सण साजरा करताना दिसत आहेत. आता दिवाळीच्या पूर्वसंध्येला कॅनडाचे पंतप्रधान (Canadian PM) जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून दिसून येत आहे की, भारतीय संस्कृती आणि परंपरा संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित करत आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे की, ‘दिवाळी आपल्याला सत्य, प्रकाश आणि चांगुलपणा नेहमीच मिळतो याची आठवण करून देते. मी दिवाळीच्या पूर्व संध्येला असेच संदेश देण्यासाठी व हे पर्व साजरे करण्यासाठी आभासी उत्सवात सामील झालो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.’ जस्टिन ट्रूडो यांनी ट्विटमध्ये व्हर्च्युअल सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ते दिवा पेटवताना दिसत आहेत. ट्रूडो यांच्या या ट्विटला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याधीही अनेकदा जस्टिन ट्रूडो विविध भारतीय सण साजरे करता दिसले आहेत.

दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यंदा सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासमवेत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी जैसलमेर सीमेवर भारतीय सैन्याच्या जवानांसह दिवाळी साजरी करू शकतात. या खास प्रसंगी पंतप्रधान मोदींसह संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख एमएम नरवणे हेदेखील सहभागी होऊ शकतात. (हेही वाचा: Diwali 2020 Special Mask With LED Lights: दिवाळी निमित्त बॅटरीवर चालणारे स्पेशल LED मास्क बाजारात उपलब्ध)

दरम्यान, हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे दिवाळी हा हिंदू धर्मियांसाठी एक शुभ प्रसंग आहे. दीपावली म्हणून ओळखला जाणारा हा सण जगभरात साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या 15 व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळी 14 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे.