जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असणारे असणारे अॅमेझॉनचे (Amazon) सीईओ आणि सह-संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. 5 जुलैला ते ई-कॉमर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडणार आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बेझोस यांनी आपल्या कर्मचार्यांना आपण सीईओपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाबद्दल पत्र लिहिले होते. यंदाच्या तिसर्या तिमाहीत बेझोस कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. आता अॅमेझॉनच्या क्लाऊड डिव्हिजनच्या अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रमुख अॅंडी जॅसी (Andy Jassy) हे बेझोस यांच्या जागी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जागा घेतील.
सुमारे 27 वर्षांपूर्वी, जेफ बेजोस यांनी काही पुस्तके इंटरनेटवर विकून अॅमेझॉ कंपनी सुरू केली होती. या कंपनीला इतकी मोठी करण्यामागे त्यांचे फार प्रयत्न आहेत. याबाबत बुधवारी माहिती देताना बेझोसने सांगितले की, 27 वर्षांपूर्वी 1994 साली 5 जुलै रोजी मी माझी कंपनी स्थापन केली आणि आता 5 जुलै, 2021 रोजी मी माझे पद सोडणार आहे. यावेळी ते खूपच भावूक झाले होते. यावेळी ते म्हणाले की, बेझोस अर्थ फंड, ब्लू ओरिजिन स्पेस शिप कंपनी, अॅमेझॉ डे वन फंड आणि वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या इतर उपक्रमांवरही लक्ष केंद्रित करण्याची त्यांची योजना आहे. (हेही वाचा: जेफ बेझोसना मागे टाकून फॅशन इंडस्ट्रीमधील Bernard Arnault बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या नक्की काय आहे त्यांचा व्यवसाय)
फेब्रुवारीमध्ये, जेफ बेझोस यांनी अधिकृत घोषणा केली होती की ते अँडी जॅसीला अॅमेझॉचा नवीन सीईओ बनवणार आहेत. अँडीने 1997 मध्ये अमेझॉनसह आपली कारकीर्द सुरु केली होती. कंपनीच्या वेबसाइटनुसार, त्याने हॉवर्ड बिझिनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. त्याने अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस सुरू केल, मग त्याचे क्लाऊड प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर झाले, ज्यांचे लाखो वापरकर्ते आहेत.
दरम्यान, बेजोस गेल्या तीन दशकांपासून अॅमेझॉनशीजोडले गेले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. एकाच दिवसात 5.22 अब्ज डॉलरच्या वाढीनंतर त्यांची एकूण मालमत्ता 202 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली होती.