जापान पीएम शिंजो आबे (Photo Credits: Getty Images)

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे  (Japanese Prime Minister Shinzo Abe)आज (28 ऑगस्ट) आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. जपानमधील स्थानिक मीडीयाच्या हवाल्यानुसार, शिंजो आबे यांनी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते याबाबत अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.

जपानचे राष्ट्रीय प्रसारक एनएचके यांच्या वृत्तानुसार, जपानी पीएम शिंजो आबे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पदभार सोडणार आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरकारी कामाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अशावेळेस पदापासून दूर जाण्याचा ते निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

शिंजो आबे त्याच्यावरील उपचारासाठी नुकतेच 2 वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. दरम्यान त्यांना अल्सरेटिव कोलाइटिस (Ulcerative Colitis) चा त्रास आहे.

ANI Tweet

दरम्यान ऑगस्ट महिन्यात काही दिवसांपूर्वी टोकिओमध्ये केईओ युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये जाताना दिसले होते. मात्र काही तासांतच ते बाहेर आले. दरम्यान मीडियाशी बोलताना त्यांनी सामान्य चाचण्यांसाठी आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 'माझी प्रकृती ठीक आहे की नाही हे तपासण्यासाठी मी आलो होतो. मी काम करण्यासाठी जात आहे आशा आहे की भविष्यात माझ्याकडून अशीच मेहनत घेतली जाईल.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.