Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

2024 च्या पहिल्या दिवशी जपानमध्ये जोरदार भूकंपाच्या मालिकेमुळे किमान 12 लोक मरण पावले आहेत, सध्या जपानचे प्रशासकीय अधिकारी आपत्तीच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोमवारपासून, राष्ट्राला सुमारे 155 भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्यात सुरुवातीचे 7.6 तीव्रतेचे धक्के आणि आणखी 6 पेक्षा जास्त भूकंप आहेत, असे जपान हवामान विभागाने सांगितले आहे. सुरुवातीच्या भूकंपानंतर लगेचच अधिकाऱ्यांनी सुनामी चेतावणी जारी केला होता, देशात 5-फूट इतक्या उंच लाटा उसळल्या. जवळपास 33,000 घरे वीजविना आहेत आणि प्रमुख महामार्गांसह देशभरातील अनेक महत्त्वाचे मार्ग कार्यरत नाहीत, त्यामुळे वैद्यकीय आणि लष्करी जवानांना बचाव सेवांमध्ये अडचण येत आहे, अशी बातमी रॉयटर्सने दिली. (हेही वाचा - Japan Earthquake: 7.2 रिश्टल स्केलच्या धक्क्याने हादरला जपान; पश्चिमी समुद्री किनार्‍यावर धक्के)

पाहा व्हिडिओ -

जपानच्या तुलनेने दुर्गम असलेल्या नोटो प्रायद्वीपमध्ये हजारो लष्करी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, हा भूकंपाचा देशातील सर्वात जास्त प्रभावित प्रदेश आहे. याठिकाणी, धावपट्टीवर तडे गेल्याने परिसरातील विमानतळांपैकी एक बंद पडलेल्या आणि खराब झालेल्या रस्त्यांमुळे बचाव कार्यात व्यत्यय आला आहे. या भागातील अनेक रेल्वे सेवा आणि उड्डाणेही निलंबित करण्यात आली आहेत, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.