Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Japan Earthquake: जपान हवामान संस्थेने(Japan Meteorological Agency)दिलेल्या माहितीनुसार, देशातील इशिकावा प्रांतात (Ishikawa)आज सोमवारी पहाटे भुकंपाचे(Earthquake)धक्के जाणवले. 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंपाची नोंद झाली. जपनाच्या चारही बाजूने समुद्र असल्याने भुकंपामुळे तेथे सुनामीचा धोका निर्माण होतो. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी सुनामीचा कोणताही धोका नसल्याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा:Earthquake in UP: सोनभद्र, यूपीमध्ये तीव्र उष्णतेमध्ये 3.9 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का)

सोमवारी सकाळी 6:31 च्या सुमारास भुकंप झाला. भुकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोल असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इशिकावा प्रीफेक्चरमधील वाजिमा आणि सुझू शहरात 5 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. याव्यतिरिक्त, नोटो शहराला 5 रिश्टर स्केल पेक्षा कमी तीव्रतेचे भुकंपाचे धक्के जाणवले, तर नानाओ शहर आणि अनामिझू शहरासह निगाता प्रीफेक्चरमधील काही भागांमध्ये 4 रिश्टर स्केल भुकंपाच्या तीव्रतेची नोंद झाली. (हेही वाचा:Earthquake in Indonesia: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भूकंपाचे जोरदार धक्के, तीव्रता 6.2, लोकांमध्ये घबराट)

भुकंपानंतर, पूर्व जपान रेल्वेने वीज खंडित झाली होती. त्याचा फटका रेल्वेसेवेला झाला. होकुरिकू शिंकानसेन आणि जोएत्सू शिंकानसेन या भागात बुलेट ट्रेन सेवा तात्पुरती ठप्प झाली होती. सकाळी 6:50 वाजता सेवा पुन्हा सुरळीत झाली.