इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 एवढी होती. इंडोनेशियाच्या दक्षिण-पूर्वेस 143 किमी अंतरावर भूकंप झाला. रात्रीची वेळ असल्याने लोक घरीच होते. दरम्यान अचानक जमीन हादरू लागली. यानंतर लोक घाबरून घराबाहेर पळू लागले. जेणेकरून त्यांचे प्राण वाचू शकतील. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

आज संध्याकाळी जपानच्या बोनिन बेटांवर किंवा ओगासावारा बेटांवर 6.9 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5.36 वाजता भूकंप झाल्याचे जपानच्या हवामान संस्थेने सांगितले. सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू टोकियोच्या दक्षिणेस 875 किमी अंतरावर बेटांच्या पश्चिम किनारपट्टीवर, 27.9 अंश उत्तर अक्षांश आणि 140.0 अंश पूर्व रेखांशावर होता.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)