Israel-Hamas War (Photo Credit: ANI)

Israel-Hamas War: इस्रायल (Israel) आणि गाझा (Gaza) यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन्ही देश या युद्धातून मागे हटण्याचा विचार करत नाहीत. गेल्या शनिवारीही गाझाने इस्रायली लष्कराला (Israeli Army) लक्ष्य केले होते. गाझाच्या दक्षिण भागात झालेल्या स्फोटात आठ इस्रायली सैनिक ठार झाले आहेत. गाझामधील आठ महिन्यांच्या लढाईत एकाच दिवसात मारले गेलेले इस्रायली सैनिकांची ही दुसरी सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात एकाच दिवसात 21 जवान शहीद झाले होते.

इस्रायल-हमासमध्ये चालू असलेल्या लढाई दरम्यान, इस्रायली सैन्याने रविवारी सांगितले की, ते दक्षिणी गाझाच्या काही भागांमध्ये लष्करी कारवायांमध्ये दररोज सामरिक विराम लागू करेल. इस्रायल-हमास युद्धसाठी आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी वाढत्या मानवतावादी संकटाचा इशारा दिला आहे. (हेही वाचा - Israel-Palestine Conflict: गाझामध्ये सामूहिक नरसंहार; इस्रायलने घेतला 210 पॅलेस्टिनींचा बळी)

रफाह शहरात संघर्ष सुरूच -

लष्कराने सांगितले की, रफाह शहरात लढाई सुरूच राहील, जिथे इस्रायल दहशतवादी इस्लामी हमास चळवळीच्या उर्वरित ब्रिगेडला लक्ष्य करीत आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, केरेम शालोम क्रॉसिंग ते सलाह अल-दिन रोड आणि नंतर उत्तरेकडील रस्त्यावरील लष्करी कारवाया पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज 0500 GMT ते 1600 GMT पर्यंत थांबवल्या जातील. (हेही वाचा - Isarel Hamas War: इस्त्रायलचा गाझातील शाळेवर बॉम्ब हल्ला; 30 नागरिकांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश (Watch Video))

इस्रायलच्या लष्कराने शनिवारी सांगितले की, दक्षिण गाझा येथे रफाह सीमेजवळ त्याच्या सैन्यावर झालेल्या सर्वात प्राणघातक हल्ल्यात आठ सैनिक ठार झाले. या हल्ल्यामुळे हमासशी लढताना मारल्या गेलेल्या इस्रायली सैनिकांची एकूण संख्या 307 वर पोहोचली आहे. लष्कराने आपल्या एका सैनिकाची ओळख 23 वर्षीय कॅप्टन वसेम महमूद म्हणून केली आहे, जो कॉम्बॅट इंजिनीअरिंग कॉर्प्समध्ये डेप्युटी कंपनी कमांडर होता.

इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, सर्व सैनिक आर्मर्ड कॉम्बॅट इंजिनिअरिंग व्हेईकल (CEV) मध्ये मारले गेले. रात्रभर केलेल्या ऑपरेशननंतर सैनिकांना विश्रांती मिळावी यासाठी ते ताब्यात घेतलेल्या इमारतींकडे जात होते. टाईम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, काफिला पुढे सरकताच मोठा स्फोट झाला.