Israel-Palestine War: इस्त्रायली नागरिकांवर हमास दहशतवाद्यांकडून सुरु असल्या अत्याचारांच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. यातील एका घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video Hamas) झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, जोडप्याला त्यांच्या मुलांसह दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे. इतकेच नव्हे तर त्यातील अल्पवयीन मुलीची तिच्या भावंडासमोर हत्या केल्याचेही सांगितले जात आहे. इस्त्रायल येथील पत्रकार इंडिया नफ्तालीने X वर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
यूएसमधील इस्त्रायली दूतावासाने दिलेह्या माहितीनुसार, आज (8 ऑक्टोबर) स्थानिक प्रमाण वेळेनुसार, जवळपास 100 इस्त्रायली नागरिकांना हमासने ओलीस ठेवले आहे. तत्पूर्वी हमासने इस्त्राईलवर अत्यंत क्रूर आणि मोठा हल्ला केला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका घराच्या कोपऱ्यात एक जोडपे आपल्या लहान मुलांना घेऊन बसले आहे. समोर हमासचे दहशतवादी हातात बंदुका घेऊन फिरत आहेत आणि त्यांना धमकावत आहेत. लहान मुलांचा संवाद आणि त्यांनी आई-बाबांना विचारलेलेल प्रश्न ऐकून आणि त्यांच्याकडे पाहून हृदय पिळवटून जाते. (हेही वाचा, Israel-Palestine War Escalates: इस्त्रायलकडून हमासला प्रत्युत्तर, 230 पॅलेस्टिनी ठार; PM Netanyahu यांचा गंभीर इशारा, Gaza Strip खाली करण्याचे आदेश)
ओलीस ठेवलेल्या जोडप्यातील पुरुषाच्या हाताला रक्त लागले आहे. ती निष्पाप मुलं घाबरा चेहरा घेऊन बाबांना विचारतात बाब तुमच्या हाताला रक्त का लागले आहे? तुम्ही ठिक आहात ना? हे विचारुन ती रडू लागतात. दुसरी मुलगी बोलते 'ती 18 वर्षांची होती. तीने जीवंत राहायला हवे होते असे आम्हाला वाटत होते' आपल्या बहिणीचा उल्ले करुन ती म्हणते 'माझी बहीण मेली आहे. तिला मारले गेले आहे' इतके बोलून ती रडू लागते. (हेही वाचा, Israel-Palestine War Escalates: इस्त्रायलवर हमासचा हल्ला, 300 हून अधिक ठार)
मुलीचे बोलणे ऐकून तिची आई तिला धीर देण्याचा प्रयत्न करते. उसणे आवसान आणून ती तिला म्हणते, तसे काही झाले नसेल. ती भेटेल. जिवंत असेल ती. इतक्यात त्यांच्यासमोर शस्त्रधारी व्यक्ती येऊन उभा राहतो आणि त्यांचा संवात थांबतो. लहान मुलं भेदरुन जातात. तो पुरुष आणि ती महिला आपल्या मलांना शरीराखाली घेऊन लपविण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, घराच्या परिसरात गोळीबाराचा आवाज होतो. आईवडील मुलांना धिर देता आणि जमीनीवर पडून राहण्यास सांगतात. जेणेकरुन अधिक प्रमाणात बचाव करता येईल.
ट्विट
Israeli family heartlessly paraded on camera by Hamas terrorists while being taken hostage. One daughter ruthlessly executed, leaving her siblings in traumatic disbelief.
This is beyond a sick act of cruelty.
The world must know and put a stop to this!#israel #gaza pic.twitter.com/MumozYJsCd
— India Naftali (@indianaftali) October 8, 2023
पुढे शस्त्रधारी व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येतो. त्याच्या हाताली बंदूक स्पष्ट दिसते. मात्र, कॅमेरा एकाच ठिकाणी स्थीर असल्याने त्याचा चेहरा पाहायाल मिळत नाही. मात्र, हातातल्या बंदुकीच्या संघीनीने तो त्यांच्या खांद्यावर दाबताना दिसतो. तसेच, त्यांना अपमानास्पदरित्या वागणूकही देताना दिसतो. दरम्यान, आपल्या 'X' पोस्टच्या माध्यमातून पत्रकार नफ्तालीने जागतिक नेत्यांना उद्देशून "हे थांबवा" असे आवाहन केले आहे.