Cervical cancer (Photo Credits: Wikimedia Commons)

जगभरात कॅन्सरचे प्रस्थ वाढत चालले असून कॅन्सर पूर्णपणे बरा करण्यासाठी खात्रीशीर औषधोपचार उपलब्ध नाहीत. मात्र कॅन्सर मुळापासून नष्ट करण्यासाठी औषधे सापडले असल्याचा दावा इस्त्राईलमधील एका बायोटेक कंपनीने केला आहे. पुढील वर्षापर्यंत हे औषधं बाजारात उपलब्ध करणार असल्याचेही कंपनीने सांगितले. कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे होणार स्वस्त? केंद्र सरकारचे मोठे पाऊल

इस्त्राईलमधील अॅक्सिलरेटेड इवोल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीची 2000 साली स्थापना झाली. या कंपनीचा हा दावा जगभरातील अनेक रुग्णांना दिलासादायक वाटत आहे.

कंपनीने विकसित केलेल्या या उपचार पद्धतीला 'MuTaTo' म्हणजेच 'मल्टी टार्गेट टॉक्सिन' असं नाव देण्यात आलं आहे. मात्र ही उपचार पद्धती नेमकी कशी विकसित झाली, याची तुम्हाला उत्सुकता असेल. तर कंपनीचे सीईओ डॉ. इलान मोराद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सध्या बाजारात उपलब्ध असलेली कॅन्सरवरील औषधं आणि उपचारपद्धती का परिणामकारक ठरत नाही, याचा शोध घेतला. त्यावेळेस त्यांना या नव्या उपचारपद्धतीचा शोध लागला. कंपनी लवकरच या औषधांची चाचणी करुन पुढील वर्षापर्यंत हे औषधं बाजारात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात या '6' पदार्थांचा समावेश करा !

कंपनीचे चेअरमन अॅरिडोर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "त्यांच्या कंपनीने विकसित केलेले हे औषधं पहिल्या दिवसापासून कॅन्सरवर परिणाम करण्यास सुरुवात करेल." त्याचबरोबर या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. विशेष म्हणजे सध्या कॅन्सरवर उपलब्ध असणारी औषधे आणि उपचारपद्धती यांच्या तुलनेत या औषधाची किंमत फार कमी आणि परवडणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.