कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे होणार स्वस्त? केंद्र सरकारचे मोठे पाऊल

महत्त्वाची औषधे रुग्णांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावी म्हणून केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.

कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे होणार स्वस्त? केंद्र सरकारचे मोठे पाऊल
Representational Image (Photo Credit- Facebook)

महत्त्वाची औषधे (crucial medicines) रुग्णांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावी, म्हणून केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने कॅन्सर आणि अन्य आजारांवरील 50 औषधे स्वस्त करण्याचे जाहिर केले आहे. यासाठी सरकार या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) ठरवणार आहे. औषधांच्या विक्रीवर 25-30% ट्रेड मार्जिन असते. यातून औषधं विक्रेता आणि होलसेलर औषधं विक्रेता जबरदस्त नफा कमवतात. त्यामुळे औषधांच्या किंमती अधिक वाढल्या आहेत. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या औषधांवर मूल्य नियमनाअंतर्गत (price regulation) सूट मिळत आहे.

पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (डीजीएचएस) ने यात 50 औषधांचा समावेश केला आहे. त्यातील 39 औषधेही कॅन्सर आणि दुर्लभ आजारांसाठी वापरली जातात.

कॅन्सर आणि इतर दुर्मिळ आजारांवरील औषधांची यादी तयार करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने आरोग्य मंत्रालयाला दिले होते. त्यामुळे या यादीतील औषधांच्या किंमती या आवाक्याबाहेर न जावू देता ही औषधे स्वस्त करण्यात येणार आहेत.

कॅन्सर आणि इतर दुर्मिळ आजारांवरील उपचार खर्चिक असतात. त्याचबरोबर औषधे देखील महाग असल्यास लोकांना आजारावर उपचार करणे अवघड होऊ शकते. त्यामुळे या औषधांच्या किंमती कमी करण्याचा आदेश लवकरच देण्यात येईल.

व्यापारातील नफा ठरविण्याकरिता सरकार 'ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर' च्या पॅरा 19 चा वापर करेल. रुग्णांच्या सोयीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे औषधे स्वस्त दरात उपलब्ध होतील. या यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लागू शकतील. मात्र या यादीतील औषधांवर 8-16% ट्रेड मार्जिन लावण्याचे अनिवार्य असणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2019 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).