
Israel-Hamas War: गाझा शहरातील दोन भागातील निवासी स्थळांवर इस्रायलकडून हवाई हल्ला(Israel-Hamas War) करण्यात आला. यात 42 पॅलेस्टिनी ठार झाले. शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "इस्रायली युद्ध विमानांनी निवासी भागात हल्ला केल्यानंतर अल-शाती निर्वासित शिबिरातील सुमारे 18 जण ठार झाले. तर, डझनभर लोक जखमी झाले." हल्ल्यात मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी ढिगाऱ्यातून अनेकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा:Israel-Hamas War: गाझासाठी इस्रायलची माघार; भयंकर युद्धादरम्यान इस्रायली सैन्याने घेतला युद्धबंदीचा निर्णय )
शनिवारी, गाझा शहराच्या ईशान्येकडील अल-तुफाह परिसरातील घरांवर इस्रायली हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 24 पॅलेस्टिनी ठार झाले, असे हमासच्या सरकारी मीडिया कार्यालयाने म्हटले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने गाझामधील हमासचा वरिष्ठ कमांडर रैद साद याला लक्ष्य केले. आतापर्यंत, मृतांची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.
इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 रोजी गाझा पट्टीवर युद्ध सुरू केले, त्यावर हमासने पट्टीजवळील इस्रायली शहरांवर लष्करी हल्ला केला. यात सुमारे 1,200 लोक ठार झाले. सुमारे 250 लोकांना ताब्यात घेतले. गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले की, इस्रायली लष्करी कारवाईत गुरुवारपर्यंत पॅलेस्टिनी मृतांची संख्या 37,431 झाली. तर 85,653 जखमी झाले आहेत.