Airstrike (फोटो सौजन्य - Pixabay)

Israel Hamas War: इस्रायलचे सैन्य हिजबुल्लाहवर सातत्याने हल्ले करत आहे. तर दुसरीकडे गाझामध्येही हमासविरुद्ध युद्ध सुरू आहे. रविवारी पहाटे गाझा मशिदीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात (Airstrike On Mosque in Gaza) किमान 18 जण ठार तर 20 जण जखमी झाले. मध्य गाझा पट्टीतील देर अल-बालाह येथील अल-अक्सा रुग्णालयाजवळ असलेल्या मशिदीवर हा हल्ला झाला. पॅलेस्टिनी भूभागात इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. युद्धाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढू शकते. कारण, ज्या मशिदीवर हल्ला झाला तेथे अनेक विस्थापित वास्तव्यास होते.

इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी देयर अल-बालाह भागात 'शुहादा अल-अक्सा' मशीद आणि त्यामधील हमास कमांड आणि कंट्रोल सेंटर चालवणाऱ्या हमासच्या अतिरेक्यांवर हल्ला केला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने गाझावर केलेल्या लष्करी हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 42,000 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. (हेही वाचा -Hezbollah Leader Hassan Nasrallah Dead: इस्त्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाह ठार)

गाझा आणि इस्रायलमधील वाढत आहे तणाव -

गाझामधील परिस्थिती अतिशय नाजूक आहे, जिथे एकीकडे युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच दुसरीकडे पोलिओ मोहिमेसारखी मानवतावादी मदतही सुरू आहे. अशा परिस्थितीत गाझा आणि इस्रायलमधील तणाव वाढत आहे. दुसरीकडे, हजारो इस्रायली नागरिकांची हत्या करून त्यांना ओलीस ठेवल्यानंतर इस्रायलने हमासविरोधातील मोहीम तीव्र केली आहे.

दरम्यान, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले होते. त्याचवेळी 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केले. या युद्धात आतापर्यंत 42,000 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.