(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

अमेरिकेने (America) इराणवर (Iran) लावलेल्या आर्थिक निर्बंधामुळे इराणकडून भारताला (India) होणारी कच्च्या इंधनाची आयात कपात केली आहे. तर एप्रिल महिन्यात या आयातीमध्ये 57 टक्क्यांची घट दिसून आली. मात्र आतापासून इराणकडून होणारी आयात पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतावर इंधनाचा खर्च वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने इराणवर आर्थिंक निर्बंध लादले होते. त्यानंतर इंधनखरेदी ही सहा महिन्यात हळूहळू संपुष्टात येणार असल्याची सूचना अमेरिेकेने भारतासह चीन आणि अन्य देशांना दिली होती.(भारत आणि चीनसह अन्य पाच देशांनी इराण कडून तेल आयात करु नये- अमेरिका)

भारताला इराणकडून कच्च्या इंधनाची आयात कमी दरात केली जात होती. परंतु आता भारताला त्याच दरात कच्चे इंधन देणे शक्य नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे इराणकडून करण्यात येणारी आयात ही संपुष्टात आल्यास त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलवर होण्याची शक्यता आहे.