प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

अमेरिकेने (America) भारत (India) आणि चीनसह (China) अन्य पाच देशांनी तेलाची आयात बंद करावी असे म्हटले आहे. अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर इराणवर (Iran) कडक निर्बंध लागू केले होते. तर इराणकडून तेल आयात करण्यासाठी 180 दिवसाची परवानगी भारत आणि चीन, जपानसह आठ देशांना दिली होती. परंतु आता अमेरिकेने इराणवर दबाब वाढण्यासाठी या देशांना तेल आयात बंद करावी असा इशारा दिला आहे.

अमेरिका परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांनी 2 मे नंतर कोणत्याही देशाला इराणकडून तेल आयात करचता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच ओमान येथे असलेल्या खातातात छाबहार बंदर उभारणीसाठी भारताने मदत केली होती. त्यामुळे अमेरिकेने भारताला इराणकडून तेल आयात करण्यासाठी काही दिवसांची परवानगी दिली होती.(हेही वाचा-H-1B Visa संख्या मर्यादित; अनेकांच्या अमेरिका वारीच्या स्वप्नांना धक्का)

चीन आणि भारत हे इराण तेलाचे सर्वात मोठे आयातदार असून त्यांनी ट्रम्प यांच्या आदेशानुसार तेलाची आयात थांबवावी. असे न झाल्यास द्विपक्षीय संबंधावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोरिया आणि जपान या देशांनी इराण सोबत असलेल्या व्यापार कमी केला आहे.