
Ramhormoz, June 24: इराणच्या रामहोर्मोझ एका 4 वर्षाच्या मुलीचा कारमध्ये मूत्यू झाला आहे. काही तास, तीव्र तापमानात पालकांनी मुलीला कारमधेच ठेवले होते. पालक मुलीला कारमध्ये सोडून अंत्यसंस्कारासाठी गेले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीला कारमध्ये बंद केले होते आणि उष्माघात आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाला. सादिया नावाची मुलगी तिच्या मावशीच्या अंत्यसंस्कारासाठी तिच्या आई-वडिलांसोबत रामहोर्मोझ येथे गेली होती. लांबच्या प्रवासामुळे मुलगी थकलेली होती आणि गाडीत झोपली होती . तिच्या पालकांनी तिला उठवले नाही आणि पालक अंत्यसंस्कारात गेले होते. मात्र, अंत्यसंस्काराच्या वेळी झालेल्या दु:खामुळे पालकांना मुलीचा विसर पडला. एका स्थानिक अहवालात असे म्हटले आहे की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रामहोर्मोजमधील तापमान 49 अंशांपर्यंत वाढले होते, ज्यामुळे कारमधील तापमान 76 अंशांपर्यंत वाढले होते. शोकग्रस्त जोडप्याचे आता समुपदेशन होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.