आयफोन 14 (iPhone 14) मध्ये असलेले एक डिटेक्शन फीचर सध्या भलतेच चर्चेत आहे. ज्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होतो आहे. तसेच, पोलिसांनाही घटनांची माहिती त्वरीत मिळत असल्याने मदत आणि बचावकार्यास विनाविलंब सक्रीय होता येते. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियातील (Australia) तस्मानिया (Tasmania Police) राज्यात पाहायला मिळाली. तस्मानिया येते एक अपघात घडला. अपघातानंतर आयफोन 14 डिटेक्शन फीचर (iPhone 14 Crash Detection Feature ) अवघ्या काही मिनीटांमध्येच सक्रीय झाले. त्यामुळे अपघाताबाबत पोलिसांना त्वरीत माहिती मिळाली. ज्यामुळे अपघातग्रस्तांपर्यंत पोहोचणे आणि मदत व बचाव कार्य राबवने पोलिसांना सहज शक्य झाले.
एसीबी न्यूजच्या हवाल्याने आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, तस्मानिया येथे सोमवारी मध्यरात्री 1.45 वाजता एक चारचाकी ट्रक झाडावर आदळला. ट्रकमधील नागरिकांना जबर मार लागला. वेदणा आणि अपघातामुळे आलेली असहायता आदी कारणांमुळे अपघातग्रस्तांना काहीच हालचाल करता येत नव्हती. इतक्यात, iPhone 14 Crash डिटेक्शन फीचर सक्रीय झाले. त्यामुळे अपघात घडल्यानंतर काहीच मिनीटांमध्ये पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर अवघ्या आठ मिनीटांमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा, iPhone Save Life: ३०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात! पण आयफोन ठरला देवदूत, वाचवला दामपत्याचा जीव)
प्राप्त माहितीनुसार, ट्रकमध्ये 15 ते 20 लोक होते. त्यातील पाच जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरीत गंभीर जखमींसाठी घटनास्थळावरच एअर अँब्युलन्स बोलावण्यात आली. ट्रकमधून निघालेल्या एका व्यक्तीकडे iPhone 14 होता. फोनमध्ये अलेल्या स्वयंचलीत क्रॅश अलर्टमुळे पोलिसांना अपघाताची माहिती कळली.
इन्स्पेक्टर रुथ ऑर यांनी सांगितले की, अलर्ट प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने प्रतिसाद दिला. पोलीस तातडने घटनास्थळी पोहोचले त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले. ऑर यांनी पुढे सांगिले की, पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अपघातग्रस्तांची शुद्ध हरपली होती. डिसेंबर 2022 मध्ये आयफोन 14 च्या सॅटेलाईट आणि क्रॅश डिटेक्शन फीचरच्या माध्यमातून एमरजन्सी एसओएसने अमेरिकेमध्ये एका गंभीर कार अपघातील लोकांनाही मदत केली होती.