आयफोनने (iPhone) जीव वाचवला हे ऐकायल विचित्र वाटत असलं तरी मात्र हे खरं आहे. कारण ३०० फूट खोल दरीत कोसळलेल्या कारमध्ये अडकलेल्या दामपत्याचा जीव आयफोनमुळे वाचल्याची घटना अमेरीकेत (America) घडली आहे. अमेरीकेतील लॉस एंजेलिस्ट फॉरेस्ट हायवेवरुन जात असताना एका दामपत्याची कार ३०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती कळलेल्यांना वाटलं की आता ही कार आणि कारमधील दामपत्य आता वाचणं शक्य नाही. पण देव तारी त्याला कोण मारी असाचं काहीसा प्रकार या अमेरीकेतील दामपत्या बरोबर घडला आहे. या अपघातात दामपत्याची कार खुप खोलवर कोसळली पण आधाराने कुठेतरी अडकली. तेव्हा दामपत्याचा जीव भांड्यात पडला.
तोच क्षणी पोलिसांना किंवा आपल्या निकटवर्तीयांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देण्यासाठी दामपत्याने आपला फोन बाहेर काढला. पण फोनमध्ये नेटवर्क नसल्याने कुणाशीही संपर्क होण अशक्य होत. तरी यावेळी आयफोन देवदुत ठरला असचं म्हणता येईल. या दामपत्याकडे अपल आयफोन १४ होता. आयफोन १४ चं नवं फिचर एसओएसनुसार सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फिचरद्वारे ॲपल कंपनीला अपघाताचा सॅटेलाईट मजकूर पाठवण्यात आला आणि या दामपत्याचं तंतोतंत लोकेशन अपल कंपनीला कळलं. (हे ही वाचा:- Turbulence on Hawaiian Airlines: टर्बुलेंसमुळे ३६ विमान प्रवासी जखमी, हवाईयन एयरलाइंसच्या लॅन्डींग पूर्वी दुर्घटना; पहा व्हिडीओ)
अपल कंपनीने या दामपत्याच्या लोकेशन बाबत पोलिसांना माहिती दिली. तोच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दामपत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर ३०० फूट खाली दरीत पोलिसांना या दामपत्याची कार सापडली आणि पोलिसांनी या दामपत्यास एअर लिफ्ट केलं. म्हणूनचं म्हणतात देव तारी त्याला कोण मारी. आयफोनचा वापर आपण फक्त फोन कॉल किंवा इंटरनेट वापराकरीता करीत असेल तरी या आयफोनने दोन जीव वाचवले आहेत. तरी या घटनेनंतर अपलच्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फिचरचे मोठे कौतुक होत आहे.