उद्योगपती Lakshmi Mittal यांचा लहान भाऊ प्रमोद मित्तल यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक
Pramod Mittal | (Photo credit: File Image)

उद्योगपती लक्ष्मी मित्तल (Lakshmi Mittal) यांचा लहान भाऊ प्रमोद मित्तल (Pramod Mittal) यांना फसवणुक केल्याच्या आरोपाखाली बुधवारी (24 जुलै 2019) अटक करण्यात आली. 57 वर्षी प्रमोद यांच्यावर तब्बल 19.32 कोटी रुपयांची फसवूक केल्याचा आरोप आहे. याच आरोपात त्यांना संशयित म्हणून युरोपमध्ये अटक करण्या आली. Lukavac येथील उत्तर पूर्व परिसरातील कोकिंग प्लांट जीआयकेआयएल (GIKIL) संबंधीत घोटाळा प्रकरणात प्रमोद यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

प्रमोद मित्तल हे सुमारे एक हजार कर्मचारी असलेल्या कोकिंग प्लांटचे 2003 पासून नेतृत्व करतात. ते जीआयकेआयएल चे सुपरवाजरी बोर्डचे अध्यक्षही आहेत. त्यांच्यावर आपल्या पदाचा गैरापर केल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, कंपनीचे जनरल मॅनेजर परमेश भट्टाचार्य आणि सुपरवाजरी बोर्डाच्या आणखी एका सदस्यालाही अटक करण्यात आली आहे. बोस्नियासाचे सरकारी वकील कॅजिम सेरहेटलिक (Cazim Serhatlic) यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात दोषी आढळल्यास दोषींना तब्बल 45 वर्षांची शिुक्षा होऊ शकते. सेरहेटलिक यांनी सांगितले की, सामूहिक गुन्हा प्रकरणाशी संबंधीत चौथ्या व्यक्तीबाबत अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. (हेही वाचा, UCO Bank: बिर्ला सूर्या लिमिटेड समूहाचे संचालक Yashovardhan Birla दिवाळखोर: युको बँक)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मित्तल आणि इतर लोकांवर 28 लाख डॉलर (19.32 कोटी रुपये) इतक्या रकमेची फसवणूक केल्याचा संशय आणि आरोप आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, उल्लेखनिय असे की, मार्च 2019 मध्ये प्रमोद यांना भाऊ लक्ष्मी मित्तल यांनी 1600 कोटी रुपये देऊन भारतातील गुन्हे प्रकरणातून कायदेशीर कारवाईपासून वाचवले होते. प्रमोद यांच्यावर स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (STC) 2,210 कोटी रुपये चुकते करणे होते.