Indian Student Dies IN US: ओहायो येथे भारतीय विद्यार्थिंनीचा मृत्यू, पोलिस तपास सुरु; कारण अस्पष्ट
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Indian Student Dies IN US: अमेरिकेच्या ओहायो (Ohio) राज्यात एका भारतीय विद्यार्थिंनीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे, अशी माहिती न्युयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने शुक्रवारी दिली. मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला आहे.  (हेही वाचा-  रुग्णालयात नवजात बाळांचा नर्संनी वाचवला जीव)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अमेरिकेतील ओहायो येथे राहणारा एक भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कसा झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही त्यामुळे अमेरिकन पोलिस या संदर्भात आणखी तपास करत आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहले आहे की, ओहायो राज्यातील क्लीव्हलँड येथील भारतीय विद्यार्थिनी श्री. उमा सत्य साई गडदे यांच्या दुर्दैवी निधनाने खूप दुःख झाले. पोलिस तपास सुरू आहे .भारतातील कुटुंबाच्या संपर्कात राहते. श्री. उमा गडदे यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात नेण्यासह सर्व शक्य सहकार्य केले जात आहे.

अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान ही घटना घडल्याने आणखींन खळबळ उडाली आहे. यापूर्वी मार्चमध्ये २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी यूएसच्या क्लीव्हलँड परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाला खंडणीचा कॉल आला आणि त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा मुलाचा शोध घेण्याची विनंती केली.