Australia: शुक्रवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनीमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला खलिस्तानी समर्थकांच्या (Khalistani Supporters) गटाने निर्दयपणे मारहाण केली. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या वेस्टमीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वृत्तानुसार, विद्यार्थ्याने त्याच्यावर चार ते पाच खलिस्तानी समर्थकांच्या गटाने हल्ला केल्याची पुष्टी केली. त्याने सांगितले की, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. सकाळी तो आपल्या गाडीत बसल्यावर गुंड तेथे पोहोचले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांपैकी एकाने कारचा दरवाजा उघडून त्याच्या डाव्या गालावर चापड मारली. नंतर इतरांनी त्याला रॉडने मारहाण केली. (हेही वाचा -Grand Cross of the Legion: भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना फ्रांसचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव)
ही घटना पाहणाऱ्या एका व्यक्तीने NSW पोलिसांना कळवले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. NSW पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पॅरामेडिक्सना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर पीडित विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याने वेस्टमीड रुग्णालयात नेण्यात आले.