भारतीय दांपत्यकडून नोकराचे शोषण, आरोपी अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो)
नोकराचे शोषण केल्याप्रकरणी एका भारतीय दांपत्याला दक्षिण इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली आहे. तर या दापंत्याने नोकराचे चार वर्ष शोषण केल्याचा आरोप लावला आहे.
चिलवर्थ येथे राहणाऱ्या  भारतीय दांपत्याकडे पोलंडमध्ये राहणारी एक व्यक्ती काम करण्यासाठी आली होती. तसेच त्याला राहण्यासाठी आणि खाण्याची व्यवस्था असेल असे सांगितले. मात्र कामावार रुजू झाल्यानंतर या नोकराला शिळे अन्न या दांपत्याकडून दिले जायचे. तसेच त्याला एका पत्र्याच्या खोलीत राहण्यास जागा दिली होती. मात्र या नोकराला हे दांपत्याला मारहण ही करायचे असे या पीडित नोकराला सांगितले आहे.
या नोकराने अखेर सामाजिक संस्थेकडे या दांपत्याविरोधात तक्रार  केली. त्यांनतर चौकशी दरम्यान या दांपत्याला अटक करण्यात आली आहे.