भारतीय वंशाचे मराठमोळे Srikant Datar यांची  Harvard Business School च्या Dean  पदी नियुक्ती!
Srikant Datar | Photo Credits: Twiiter/ MLA Rohit Pawar

भारतीय वंशाचे मराठमोळे श्रीकांत दातार (Srikant Datar) यांची हार्वर्ड बिजनेस स्कूल (Harvard Business School)च्या डीन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यापूर्वी देखील नितिन नोहरिया हे भारतीय वंशाचे प्राध्यापक हे डीन आहेत. श्रीकांत दातार 1 जानेवारी 2021 पासून पदभार स्वीकारणार आहेत. 112 वर्ष जुन्या हावर्ड बिझनेस स्कूलचे श्रीकांत हे दुसरे भारतीय वंशाचे डीन आहेत. श्रीकांत दातार हे 1973 साली मुंबई युनिव्हर्सिटी (University of Bombay) मधून पदवीधर झाले आहेत. त्यानंतर आयआयएम अहमदाबाद (Indian Institute of Management, Ahmedabad) मधून पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत.

सध्या श्रीकांत दातार हे हावर्ड बिझनेस स्कूलच्या विद्यापीठाचे वरीष्ठ असोसिएट डीन आहेत. दातार हे प्राध्यापक असण्यासोबत 'इनोव्हेटिव शिक्षक' म्हणून ओळखले जातात. त्यांनी कोरोना संकट काळामध्येही हार्वर्ड बिजनेस स्कूल मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे बिझनेज स्कूलचं भविष्य पाहता त्यंच्या दुरगामी विचार करण्याचा वृत्तीचा, इनोव्हेटिव्ह गोष्टींचा आणि अनुभवाचा फायदा घेता येऊ शकतो या विचाराने त्यांनी डीन पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष लॅरी बैकोव यांनी दिली आहे.

श्रीकांत दातार यांच्या डीनपदी नियुक्तीची घोषणा होणं ही मराठी माणसाची अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार रोहित पवार आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही खास ट्वीट करत हा अभिमानाचा क्षण शेअर करण्यात आला आहे.

राज ठाकरे ट्वीट

आमदार रोहित पवार 

CMO Maharashtra  

श्रीकांत दातार हे बिझनेस स्कूलच्या इतिहासामधील 11 वे डीन आहेत. यापूर्वी पदभार सांभाळत असलेल्या नोहारिया यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पदमुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली होती त्यानंतर जून महिन्यापर्यंत ते डीन म्हणून काम पाहणार होते पण कोरोना संकटामुळे हा कार्यकाळ वाढवण्यात आला. आता मे वर्षअखेरीला निवृत्ती घेतील.

दातार यांनी भारतामध्ये शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेच्या Stanford University मध्ये मास्टर्स डिग्री statistics and economics मध्ये तर पीएचडी business मध्ये केली आहे. त्यांना शिक्षक म्हणून अध्यापनाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या कार्याचा गौरव George Leland Bach Teaching Award देऊन करण्यात आला आहे. 1996 साली हावर्ड बिझनेस स्कूल जॉईन केले. तेथे देखील ते प्राध्यापक होते. हळू हळू त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले.

सध्या दातार अमेरिकेत Novartis आणि T-Mobile US या कंपनीमध्ये boards of companies चा देखील भाग आहेत.