Indian Aircraft Returned From France: फ्रान्समध्ये अडकलेल्या 276 भारतीयांची सुटका; 4 दिवसानंतर विमान मुंबईत परतले
Aircraft (Image Credit - ANI X)

मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये भारतीय विमान (Indian Aircraft) अडकून पडले होते. या विमानात एकूण 303 भारतीय प्रवासी होते. गेल्या 4 दिवसांपासून हे विमान फ्रान्समध्ये (France) अडकून पडले होते. या प्रवाशांना भारतात परत आणण्याचे भारत सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. आज म्हणजेच मंगळवारी पहाटे हे विमान मुंबईत (Mumbai Airport) उतरले आहे. मायदेशी परतताच भारतीय प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.  फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या विमानामध्ये 303 भारतीय होते. यापैकी 276 भारतीय मुंबईत परतले आहेत. तर दोन अल्पवयीन प्रवाशांसह 25 प्रवासी फ्रान्समध्येच थांबून आहेत. (हेही वाचा - France: फ्रान्समध्ये थांबवण्यात आले 303 भारतीयांना घेऊन जाणारे विमान; मानवी तस्करीचा संशय)

पाहा पोस्ट -

फ्रान्सच्या न्यायालयाच्या आदेशानंतर या विमानाला भारताकडे उड्डाण भरण्याची परवानगी देण्यात आली. चार न्यायाधीशांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची चौकशी केल्यानंतर विमान सोडण्याचे आदेश दिले. सोमवारी सकाळी फ्रान्समधील वाट्री विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले. मंगळवारी पहाटे २७६ प्रवाशांसह हे विमान मुंबई उतरलं आहे.