देशाचे परराष्ट्र मंत्री  एस जयशंकर (EAM S Jaishankar) यांनी भारत यूएई नात्यावर (India UAE Rlation) महत्वपूर्व विधान केलं आहे.  भारत आणि UAE या दोन्ही देशातील नातं खास आहे. हे दोन्ही देश एकमेकांच्या घनिष्ट संपर्कात आहेत. तसेच भारत आणि युएईची ही अतूट मंत्री बदलत्या जगाला नावा आकार देण्यासाठी देखील उपयोगी पडेल. युएई हा भारताचा सच्चा मित्र हे असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले. भारत आणि युएई या दोन्ही देशाची मैत्री द्विपक्षीय शक्यतांद्वारे मर्यादित नसल्याने दोन्ही देशांचे संबंध अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत, असही जयशंकर म्हणाले. UAE भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार असुन दुसरी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ देखील आहे. एस जयशंकर यांनी आपल्या भाषणा दरम्यान बरेच महत्वाचे मुद्दे मांडले असुन त्यांच्या भाषणाने संपूर्म जगाचं लक्ष वेधल आहे.

 

जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार इतक्या सहज पूर्ण झाला की यावरुन दोन्ही देशातील मैत्रीचं प्रमाण मिळते. भआरत आण युएईमध्ये सुरु असलेले जुने व्यापार आणि गुंतवणुक सुरुच आहे. पण आता त्याचसोबत अंतराळ, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य आणि स्टार्टअप्स यांत देखील भारत आणि युएई एकत्र येवून काम करणार आहे. इतर देशांपेक्षा सर्वाधिक भारतीय युएईमध्ये राहतात. त्यावरुन भारत आणि युएई या दोन्ही देशाच्या मैत्रीचा अंदाज येतो. (हे ही वाचा:- Recent Geopolitical Developments by Dr Jaishankar: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडून युएई सोबत नव्या भूराजकीय संबंधांना बळकटी)

 

तसेच यावर्षी एप्रिल-सप्टेंबर दरम्यान भारताची UAE मधील निर्यात सुमारे USD 16 अब्ज होती. ज्यात दरवर्षीच्या तुलनेत तब्बत 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे., भारताची आयात त्याच कालावधीत 38 टक्क्यांनी वाढून USD 28.4 बिलियनवर पोहोचली होती. भारताने G20 चं अध्यक्ष पद सांभाळल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. 12 ते 16 डिसेंबर दरम्यान म्हणजे पाच दिवस हा कार्यक्रम दुबई आणि अबू धाबी येथे पार पडणार आहे. तरी विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली आहे.