Pakistan PM Shehbaz Sharif (फोटो सौजन्य - Edited Image)

Pakistan Declares Emergency: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढत आहे. झेलम नदीतील पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्यामुळे, पाकव्याप्त काश्मीर (POK) प्रशासनाने आपत्कालीन निर्बंध लादले आहेत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजा आणि बदल्या तात्काळ थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत. 25 एप्रिल रोजी झेलम व्हॅली आरोग्य संचालनालयाने जारी केलेल्या आदेशात 'आणीबाणीची परिस्थिती' असल्याचे नमूद करण्यात आले होते आणि सर्व रुग्णालये आणि आरोग्य युनिटमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित ड्युटी पॉइंट्सवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. कोणत्याही कर्मचाऱ्याला रजा किंवा बदली दिली जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. यासोबतच सरकारी वाहनांच्या खाजगी वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानने जारी केलेल्या आदेशात असं म्हटलं आहे की, 'देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, सर्व आरोग्य केंद्रांच्या प्रभारींना जिल्हा मुख्यालय रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय केंद्रांमध्ये कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकांना सदैव तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.' (हेही वाचा -UNSC On Pahalgam Terrorist Attack: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध)

यासोबतच, आरोग्य केंद्रांमधील सर्व वैद्यकीय अधिकारी/पॅरा मेडिकल स्टाफ जे आधीच रजेवर आहेत, त्यांना त्यांच्या रजा रद्द करण्याचे आणि त्यांचे कर्तव्य केंद्र सोडण्यापूर्वी कार्यालयाकडून लेखी परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर निष्काळजीपणा आढळला तर संबंधित डॉक्टर/पॅरामेडिकल वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू होईल. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी; केंद्रीय गृह मंत्रालयाने NIA कडे सोपवला तपास)

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला -

पाकव्याप्त काश्मीर प्रशासनाने अचानक हे पाऊल उचलले आहे, जे भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या दहशतीचे लक्षण म्हणून पाहिले जाऊ शकते. भारतीय सुरक्षा संस्थांनीही या आणीबाणीच्या आदेशाला गांभीर्याने घेतले आहे. गुप्तचर अहवालांनुसार, नियंत्रण रेषेजवळ, विशेषतः पहलगाम परिसरात आणि त्याच्या आसपास असामान्य लष्करी किंवा दहशतवादी कारवाया वाढू शकतात अशी भीती आहे.