India-Japan Relations: प्रकृती अस्वास्थ्यामुळे जपानचे PM Shinzo Abe यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिंजो आबे यांच्या नेतृत्व आणि वैयक्तिक बांधिलकीमुळे भारत-जपान संबंध अधिक मजबूत झाले. तुमच्या त्वरित पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
शिंजो अबे हे मागील काही दिवसांपासून आजाराशी लढा देत होते. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे राजीनामा देताना शिंजो अबे भावूक झाले. आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. (हेही वाचा - Shinzo Abe Resigns: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला PM पदाचा राजीनामा)
Pained to hear about your ill health, my dear friend @AbeShinzo. In recent years, with your wise leadership and personal commitment, the India-Japan partnership has become deeper and stronger than ever before. I wish and pray for your speedy recovery. pic.twitter.com/JjziLay2gD
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2020
दरम्यान 2016 मध्ये जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठं यश मिळालं होतं. त्यावेळी भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार झाला होता. या करारामुळे दोन्ही देशांतील अणुऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील भागीदारीसाठी मार्ग मोकळा झाला होता. यावेळी भारत-जपानमध्ये इतर नऊ करारांवरदेखील स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.