USA On India-Canada Row: कॅनडाच्या भारतावर Hardeep Singh Nijjar च्या खूनाच्या मध्ये हात असल्याच्या दाव्यांवर अमेरिकेच्या व्हाईट हाऊस कडून प्रतिक्रिया आली समोर!
India - Canada | Twitter

कॅनडाने भारत सरकार वर Hardeep Singh Nijjar या खलिस्तानी नेत्याला British Columbia च्या Surrey मध्ये ठार केल्याच्या प्रकरणी जबाबदार धरलं आहे. त्याबाबत गंभीर आरोप केल्यानंतर आता अमेरिकेची यावरील प्रतिक्रिया समोर आली आहे. व्हाईट हाऊसने कॅनडाच्या आरोपांना 'गंभीर' असल्याचं सांगत त्याची सखोल चौकशी व्हावी असं म्हटलं आहे.

भारताने Hardeep Singh Nijjar ला 2020 मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केले होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Jake Sullivan यांनी गेल्या आठवड्यात भेट झाली तेव्हा कॅनडाने केलेल्या दाव्यांवर चर्चा करण्यात आली होती, असे व्हाईट हाऊसमधील Coordinator for Strategic Communications at the National Security Council John Kirby यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. “या विषयावर चर्चा झाली. द्विपक्षीय संबंधांबद्दल बोलणे आम्ही निश्चितपणे त्या दोन देशांवर सोडू,” अशी प्रतिक्रिया John Kirby यांनी दिली आहे.

' हे प्रकरण गंभीर असल्याने त्याची सखोल चौकशी गरजेची आहे. आमची अपेक्षा आहे की यामध्ये भारत सहकार्य करेल.' असेही Kirby म्हणाले.

“भारतासह, आम्ही Quad मध्ये आणि इतर अनेक देशांमध्ये त्यांच्यासोबत भागीदार आहोत आणि आम्ही त्यांच्यासोबत आणि प्रदेशातील इतर देशांसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहोत." असे State Department's Deputy Spokesperson Vedant Patel म्हणाले आहेत.

भारत कॅनडा नंतर यूके मध्येही खलिस्तानी आणि भारतीयांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका भारतीय दूतावासाला ग्लास्को मध्ये गुरूद्वारेमध्ये जाण्यापासून त्यांनी रोखलं आहे. युके स्थित शीख बांधवांवरही हल्ले होण्याचे काही प्रकार मागील काही दिवसांत समोर आले आहेत.