Joe Biden | (Photo Credits: Facebook)

भारत (India) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) साजरा करत असुन आज भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन आहे. जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (President Of America Joe Biden) यांनी देखील भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि अमेरीका (America) हे दोन मोठी लोकशाही (Democracy) असलेले देश एकत्रीत येवून जागतिक शांतता, सुव्यवस्थेसाठी आणि सुरक्षेसाठी काम करतील. तसेच जागतिक पातळीवर येणाऱ्या आव्हानांना सोबत पुढे जातील. भारत-अमेरीकेचे एक्य दर्शवणारे सुचक विधान करत अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी भारताला स्वातंत्र्यादिनाच्या (Independence Day Wishes) शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भारताच्या या अमृत महोत्सवी अमेरीका देखील भारताच्या हा उत्साहात आपला सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले आहेत. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला भारताचे खास अभिनंदन बायडन यांनी केल आहेत. तसेच सत्य (Truth) आणि अहिंसेची (Non Violence) शिकवण देणारे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) बद्दल जो बायडन यांनी आदर व्यक्त केला आहे. तसेच भारतीय नागरिकांसह अमेरीकेत राहणाऱ्या भारतीयांना देखील बायडन यांनी देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (हे ही वाचा:- Salman Rushdie Health Update: सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटर हटवला; हल्लेखोर Hadi Matar ला पश्चाताप नाही)

 

भारत आज 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असुन प्रत्येक भारतीय स्वातंत्र्याच्या रंगात रंगला आहे. जगभरातून भारताला अमृत महोत्सवाच्या खास शुभेच्छा देण्यात येत आहे. भारताबाहेर वास्तव्यास असलेले भारतीय देखील मोठ्या उत्साहात आज जगभरात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.