Indonesia Marriage Fraud: प्रेमविवाहात सुखी संसाराचे स्वप्न प्रत्येक प्रेमी युगुल पाहत असतो. पत्नीने आपल्यापासून अंतर ठेवू नये. कायम सोबत रहावं असं प्रत्येक नवऱ्याला वाटतं. किंबहूना प्रत्येक नव्या लग्नात असेच चित्र असते. मात्र, इंडोनेशियामध्ये एकाची प्रेमविवाहात चांगलीच फसवणूक (scam) झाली आहे. त्याने प्रेयसी समजून एका पुरूषासोबत लग्न केले(Man Married with Man). मात्र, संशय येताच लग्नाच्या 12दिवसात त्याने पुरुषापासून पिच्छा सोडवला, थेट घटस्फोट घेतला. अदिंडा कांझा,26 , असे फसवणूक करणाऱ्या पुरूषाचे नाव आहे. तर अलिस उर्फ एके असे पिडीत पुरूषाचे नाव आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत माहिती दिला, अदिंडा आणि एके यांची सोशल मिडीयावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. पुढे त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्याने प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला होता. भेटीवेळी अदिंडा पारंपारिक मुस्लिम पोशाखात आल्याचे एके याने सांगतिले. ज्यात तिचा चेहरा पूर्ण झाकला होता. ती रूढी, परंपरांना जास्त प्राधान्य देत असल्याने तिने तो पोशाख घातल्याचे एके यांने सांगितले. लग्नाबाबत बोलणी सुरू असताना, कुटुंब नसल्याने अदिंडा हिच्या घरचे कोणीच उपस्थित राहणार नसल्याचे तिने सांगितले. त्यावर 12 एप्रिल रोजी एकेच्या घरी दोघांनी लग्न केले.
लग्नानंतरही, अदिंडाने सतत तिच्या नवऱ्यापासून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय, नवऱ्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांसोबत एकत्र येण्यास नकार दिला. पुढे, तिने मासिक पाळीचे कारण सांगून जवळीक टाळण्याचा बहाना केला. लग्नाचे बारा दिवस सुरू असलेल्या या खेळाला एके अखेर कंटाळला. त्याने पत्नीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला.
चौकशी दरम्यान, अदिंडाचे आई-वडील अजूनही जिवंत असून तो एक मुलगा असल्याचे एकेला कळले. तसेच त्याला क्रॉस ड्रेसिंगचा आजार असल्याची माहिती मिळाली. पोलिस तपासादरम्यान उघडकीस आले की अदिंडाने त्याच्या कुटुंबाची मालमत्ता चोरण्यासाठी एकेशी लग्न केले.