पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि तेहरीक ए इन्साफ (Tehreek-e-Insaf) पार्टीचे सर्वेसर्वा इमरान खान (Imran Khan) यांच्याबद्दल एक नवा वाद निर्माण झाला आहे. एका महिलेसोबतचे त्यांचे एक कथीत सेक्स कॉल (Sex Call ) रेकॉर्डींग ऑनलाईन रुपात बाहेर आले आहे. या ऑडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. मात्र, या व्हिडिओत 'तुम्ही माझे हृदय तोडले' असे एक महिला त्यांना म्हणत असल्याचा दावा केला जातो आहे. दोन व्यक्तींमधला हा संवाद अत्यंत अश्लिल भाषेत असून या संवादातील पुरुषाचा आवाज हा इमरान खान (Imran Khan ‘Sex Call’ Controversy) यांचा असल्याचे दावा केला जातो आहे.
पाकिस्तानात पुढच्या वर्षी निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या हातात एक कोलीतच मिळाले आहे. ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसली तरी, इमरान खान यांच्यावर मात्र तीव्र शब्दांमध्ये टीका होऊ लागली आहे. पाकिस्तानमधील विविध अहवाल आणि स्थानिक माध्यमांनुसार, पीटीआय संस्थापक कथित कॉल लीकमध्ये माजी पंतप्रधानांना आपण एका महिलेशी "फक्त प्रौढांसाठीचे संभाषण" (Adult Conversation) करताना ऐकले जाऊ शकते. (हेही वाचा, Imran Khan: सौदीचे राजे प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांनी इमरान खान दिलेल्या भेटवस्तू 2 दशलक्ष डॉलर्सला विकल्या; प्रसारमाध्यमांचा दावा)
In the alleged sex call leak, Imran Khan has become Emraan Hashmi.
— Naila Inayat (@nailainayat) December 19, 2022
ट्विट
Someone from Pakistan sent me a video from a YouTube channel called Syed Ali Haider Official, run by a Pak journalist. The latest video supposedly contains an audio clip of @ImranKhanPTI with 2 women.
Imran Khan is certainly not waiting to go to jannat & get 72 hoors. pic.twitter.com/SSDULga6qk
— Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) December 20, 2022
ऐकण्यास अत्यंत धक्कादायक आणि अश्लिल वाटावे असे शब्द वापरत एक महिला इमरान खान यांच्याशी बोलताना 'माझा प्रायव्हेट पार्ट दुखत' असल्याचे सांगताना कथीत रित्या ऐकायला मिळते. पुढे बोलताना ती महिला म्हणते की, मला बरे वाटले (प्रकृती ठिक असेल) तरच मी आपल्याला भेटायला येईन. यावर इमरान खान म्हणतात की, माझे कुटंब आणि मुले येत आहेत. त्यामुळे त्यातून मला शक्य झाले तर मी स्वत:हून तुला उद्या भेटायला येईन.
दरम्यान, व्हायरल झालेली ऑडीओ क्लिप स्थानिक पत्रकार सय्यद अली हैदर यांनी यूट्यूबवर शेअर केली होती. कथित कॉल रेकॉर्डिंगने इस्लामिक राष्ट्र (पाकिस्तान) हादरले आहे. कारण स्थानिक न्यूज पोर्टलने दावा केला आहे की हा ऑडिओ पाकिस्तान पीएमओ (पंतप्रधान कार्यालय) येथे रेकॉर्ड करण्यात आला होता. काही अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये खान एका महिलेशी अत्यंत जवळकीने संभाषण करत होते.