Donald Trump Hush Money Trial: डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधीत हश मनी खटला सुरु असताना एकाने स्वत:ला पेटवले (Watch Video)
Donald Trump (PC - File Image)

यूएसचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा समावेश असलेल्या ऐतिहासिक हश मनी (Hush Money Case) खटल्यावर डाउनटाउन मॅनहॅटन कोर्ट हाऊसमध्ये सुनावणी सुरु असताना धक्कादायक घटना घडली आहे. खटला कोर्टात सुरु असतानाच फ्लोरीडा येथील एका व्यक्तीने स्वत:ला कोर्टाबाहेरील आवारात पेटवून घेतले. या व्यक्तीला वाचविण्यात उपस्थितांना आणि आग नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांना यश आले. मात्र, यामध्ये तो गंभीर भाजल्याचे समजते. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. दरम्यान, कोर्टाच्या आवाराबाहेर घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खटला ऐकण्यासाठी कोर्टाच्या आवाराबाहेर मोठी गर्दी

कोर्टाबाहेर घडलेल्या घटनेचा साक्षीदार असलेल्या लोकांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश असलेला खटला ऐकण्यासाठी कोर्टाच्या आवाराबाहेर मोठी गर्दी जमली होती. या वेळी हा व्यक्तीही गर्दीत होता. त्याने स्वत:ला गर्दीत असतानाच पेटवून घेतले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दीमध्ये अनेकांनी या व्यक्तीला पत्रके वाटताना आणि फेकतानाही पाहिले होते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, एका साक्षीदाराने स्वत:चे नाव सांगण्यास नकार देत म्हटले की, स्वत:स पेटवून घेतलेल्या व्यक्तीसोबत आपला काही वेळापूर्वीच प्रासंगिक संवाद झाला होता. या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले आणि पुढचे जवळपास तीन मिनीटे तो जळत होता. सीएनएनच्या पत्रकारांनीही या घटनेची पुष्टी केल्याचा उल्लेख इंडिया टुडेने आपल्या वृत्तात केला आहे. (हेही वाचा, Donald Trump Warns Bloodbath: 'यूएस अध्यक्षपदी निवड न झाल्यास रक्तपात करेन', डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा)

डाउनटाउन मॅनहॅटन कोर्ट हाऊसमध्ये सुरु आहे खटला

डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉर्नस्टारला पैसे दिल्याचा आरोप आहे. हा खटला डाउनटाउन मॅनहॅटन कोर्ट हाऊसमध्ये चालला आहे आणि बारा पंचांसमोर त्याची सुनावणी पार पडत आहे. या बाराजणांमध्ये सात पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. यातील बहुतेकजण हे व्हाईट कॉलर व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. यात दोन कॉर्पोरेट वकील, एक सॉफ्टवेअर अभियंता, एक स्पीच थेरपिस्ट आणि एक इंग्रजी शिक्षक. बहुतेक लोक मूळ न्यू यॉर्कर नाहीत, जे संपूर्ण युनायटेड स्टेट्स आणि आयर्लंड आणि लेबनॉन सारख्या देशांतून आलेले आहेत. (हेही वाचा, Nobel Peace Prize Nominations: इलॉन मस्क यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; Donald Trump, Julian Assange यांच्याशी असणार स्पर्धा)

ज्युरीमध्ये सात पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे, बहुतेक व्हाईट कॉलर व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत: दोन कॉर्पोरेट वकील, एक सॉफ्टवेअर अभियंता, एक स्पीच थेरपिस्ट आणि एक इंग्रजी शिक्षक. बहुतेक लोक मूळ न्यू यॉर्कर नाहीत, जे संपूर्ण युनायटेड स्टेट्स आणि आयर्लंड आणि लेबनॉन सारख्या देशांतून आलेले आहेत.

व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

सन 2016 मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला त्यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी 130,000 डॉलर इतकी रक्कमी दिली होती. हा व्यवहार ट्रम्प यांनी सरकार आणि जनतेपासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांनी पॉर्नस्टारसोबत असलेले कथीत लैंगिक संबंध लपविण्यासाठी हे पैसे दिल्याचा मुख्य आरोप आहे.