Google वर 'Bhikhari' हे सर्च केल्यावर पाकिस्तान पंतप्रधान Imran Khan यांचा फोटो
पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान (फोटो सौजन्य- ट्विटर)

Google: आज जगभरात सोशल मिडियाचा वापर सर्रास केला जातो. लोक कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी गुगल या सर्च इंजिजनच्या सहाय्याने शोधतात. मात्र सध्या गुगल(Google)वर 'भिखारी'(Bhikhari) हे सर्च केल्यावर पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचा फोटो दावखला जात आहे.

'भिखारी' हा शब्द सर्च केल्यावर इम्रान खान यांचा फोटो दाखवला जात असल्याने पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे गुगलच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना समन्स पाठविण्यात आले आहे. तर एका महिला पत्रकाराने ट्विटच्या माध्यमातून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai)  यांच्यावर टीका करण्यात आली आहे.(हेही वाचा-Idiot सर्च केल्यावर का दाखवला जातो Donald Trump यांचा फोटो, Sundar Pichai यांनी दिले स्पष्टीकरण)

खरंतर पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहेत. त्यामुळे इम्रान खान आणि पाकिस्तान कर्ज घेण्याचे प्रयत्न करत असल्याने त्यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळेच भिखारी हा शब्द सर्च केल्यावर त्यांचा फोटो येत असणार असे सांगितले जात आहे.