Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरातील अनेक देश त्रस्त आहेत. कोरोना बाधितांचा वाढता आकडा आणि मृतांची संख्या दिवसागणित वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 2.56 कोटींच्या पार गेला असून 855,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवार सकाळपर्यंत जगभऱातील कोरोना बाधितांची संख्या 25,660,482 इतकी होती. तर मृतांचा आकडा 855,444 वर पोहचला होता. अशी माहिती माहिती युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) कडून देण्यात आली आहे.

CSSE च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांचा आकडा 6,073,174 वर पोहचला आहे. तर 184,644 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेली अमेरिका अद्याप प्रथमस्थानी आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या स्थानी असून देशात 3,950,931 कोरोना रुग्ण आहेत. तर 122,596 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 37,69,524 वर; मागील 24 तासांत 78,357 नव्या रुग्णांसह 1045 मृतांची नोंद)

कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:

अमेरिका 6,073,174
ब्राझील 3,950,931
भारत 3,769,524
रशिया 997,072
पेरु 652,037
दक्षिण आफ्रिका 615,094
मेक्सिको 606,036
स्पेन 470,973
अर्जेंटिना 428,239
चिली 413,145
इराण 376,894
ब्रिटन 339,385
फ्रान्स 323,968
सौदी अरेबिया 316,670
बांग्लादेश 314,946
पाकिस्तान 296,149
तुर्की 271,705
इटली 270,189
जर्मनी 246,015
इराक 238,338
फिलिपिन्स 224,264
इंडोनेशिया 177,571
कॅनडा 131,422
युक्रेन 126,279
कत्तार 118,994
इज्राईल 118,538
बोलिविया 116,598
इक्वाडोर 114,309
कजाकिस्तान 105,872

10,000 पेक्षा अधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत 65,288, मॅक्सिको 65,241, ब्रिटेन 41,592, इटली 35,491, फ्रान्स 30,666, स्पेन 29,152, पेरू 28,944, इराण 21,672, कोलंबिया 19,662, रशिया 17,250, दक्षिण अफ्रीका 14,263 आणि चिली 11,321 या देशांचा समावेश आहे. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या यामुळे कोरोनावरील लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.