UK Khalistani | Twitter

स्कॉटलंडमधील (Scotland) भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी (Vikram Doraiswami) यांना खलिस्तानवाद्यांनी गुरु ग्रंथ साहिब गुरुद्वाराबाहेर रोखल्याच्या प्रकरणी आता गुरुद्वाराकडून वैयक्तिक माफी मागण्यात आली आहे. विक्रम दोराईस्वामी यांना रोखल्याचा व्हिडिओ काल सोशल मीडीयामध्ये तुफान वायरल झाला आहे.

ग्लासगो गुरुद्वारा समितीने उच्चायुक्तांना लिहिलेल्या पत्रात असे आश्वासन दिले आहे की या अनुचित घटनेत शमशेर सिंग आणि रणवीर सिंग असे दोन जण सामील आहेत. समितीने भारतीय राजदूताची माफी मागितली असून आता त्यांना पुन्हा गुरुद्वाराला भेट देण्याची विनंती केली आहे. त्याबद्दल निमंत्रणही दिलं आहे. 'गुरुद्वारा सर्व समुदाय आणि पार्श्वभूमीतील लोकांसाठी खुले आहे आणि आम्ही आमच्या विश्वासाच्या तत्त्वांनुसार सर्वांचे खुलेपणाने स्वागत करतो.' असं त्यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

दोराईस्वामी यांनी अल्बर्ट ड्राइव्हवर ग्लासगो गुरुद्वाराच्या गुरुद्वारा समितीसोबत बैठकीची योजना आखली होती. मात्र खलिस्तानींनी त्यांना रोखले. त्यांना प्रार्थना न करताच परत जावं लागलं.

सध्या कॅनडा मध्येही खलिस्तानींमुळे भारत-कॅनडाचे संबंध ताणले गेले आहेत. Hardeep Singh Nijjar या खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला ठार करण्यामध्ये भारत सरकारचा हात असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरून संबंध ताणले गेले आहेत. भारत  सरकारने हे आरोप फेटाळले आहेत.