Imran Khan Escapes Plane Crash: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना घेऊन जाणारे विमान शनिवारी अपघातातून बचावले. डेली पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, इम्रान खान शनिवारी गुजरांवाला येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जात होते. यादरम्यान विमानाचा तोल सुटू लागला, त्यानंतर पायलटने घाईघाईने कंट्रोल टॉवरशी संपर्क साधला आणि विमान इस्लामाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळविले. मात्र, त्यानंतर खान हे रस्त्याने गुजरांवाला गेले.
गुजरांवाला येथे पोहोचताच पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या अध्यक्षांनी लोकांना संबोधित केले आणि इशारा दिला की, सध्याच्या सरकारमध्ये देश आणि अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर आवाज उठवा. जिना स्टेडियममध्ये बोलताना इम्रान खान म्हणाले की, ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांना मी संबोधित करत आहे. (हेही वाचा - बेकायदेशीरपणे 'टॉप सर्च इंजिन' राहण्यासाठी Google कंपन्यांना दरवर्षी देते अब्जावधी रुपये; US न्याय विभागाचा आरोप)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. तसेच सरकारने तसे न केल्यास त्यांच्या आवाहनाला शांततेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अन्यथा जबरदस्तीने निवडणुका घेण्यात येतील, असा इशाराही दिला.
PTI chairman and former Premier Imran Khan’s plane averted from a fatal accident on Saturday while he was on his way from Chaklala to Gujranwala for a rally.#Pakistan #ImranKhan https://t.co/hMBYByLIog
— The Pakistan Daily (@ThePakDaily) September 10, 2022
दरम्यान, इम्रान खान यांच्यावर एका महिला न्यायाधीशाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप आहे. अवमान प्रकरणात इम्रान खानचा जबाब असमाधानकारक असल्याचे सांगत न्यायालयाने त्याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.