रशियन सौंदर्यवती सोबत मैत्री, या मैत्रीतन फुललेले प्रेम आणि पुढे या प्रेमातून विवाह करण्यासाठी केलेला सिंहासन आणि राजघराण्याचा त्याग. या सर्व गोष्टींमुळे मलेशिया (Malaysia) देशाचा राजा सुल्तान मुहम्मद व्ही (Muhammad V) हा जानेवारी महिन्यात फारच चर्चेत आला होता. त्याने ओक्साना वीवोदीना (Oksana Veovodina) नावाच्या रशियन सौंदर्यवतीसोबत विवाह केला. या विवाहापोटी त्याने सत्तापद सोडायलाही मागेपुढे पाहिले नाही. या विवाहाची जगभरातील प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियात प्रचंड चर्चा झाली होती. मात्र, विवाहानंतर सुल्तान मुहम्मद आणि ओक्साना यांच्या संसाराचा गाडा फार काळ पुढे चालू शकला नाही. दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे.
सुल्तान मुहम्मद याची 27 वर्षीय माजी पत्नी ओक्साना वीवोदीना हिने आपल्या पतीबद्दल (सुल्तान मुहम्मद) याच्याबातब एक भावनिक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात तिने आपल्या प्रेमाबद्दल बरेच काही म्हटले आहे. तिने म्हटले आहे की, आम्ही आयुष्यभर एकमेकांबद्दल चांगले चिंतीत राहू. मी त्याच्या आयुष्यातील अंतिम महिला बनू इच्छिते. मी त्याच्यासोबत आयुष्य समर्पीत करु इच्छीते.
ओक्साना वीवोदीना हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुल्तान हे खूपच चांगले बोलत असत. ते आपल्या मुलांना आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वबूर्ण हिस्सा मानतात. मुले ही आपल्यासाठी महत्त्वाची असतात कारण ते आपला वंश, परंपरा पुढे चालवतात. प्रेम ही गोष्ट चांगली आहे. परंतू, 15 ते 20 वर्षांनंतर साहस आणि समज आदी कारणांमुळे अनेक गोष्टी प्रेमाच्याही पुढे जातात.
दरम्यान, ओक्साना वीवोदीना हिने पोस्ट केलेला हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. मात्र, या व्हिडिओत दोघेही आपल्या मातृभाषेत न बोलता इंग्रजित बोलताना दिसत आहेत. ओक्साना हिने हा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला आहे. व्हिडिओत ओक्साना गर्भवती असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ दोघांच्याही विवाहापूर्वीचा असल्याचे बोलले जात आहे.