Flash Floods in DRC | (Photo courtesy: Twitter)

DRC Floods: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (Democratic Republic of the Congo) च्या पुर्वेला अचानक आलेल्या महापूरात सुमारे शेकडो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये लहान मुल, महिला आणि वृद्धांसह सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. मृतांचाच निश्चित आकडा अद्याप समजू शकला नाही. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तात मृतांचा आकडा 150 पेक्षा अधिक म्हटले आहे. तर, रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्त देणाऱ्या वृत्तसंस्थेचा दाखला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात मृतांचा आकडा 200 पेक्षाही अधिक असल्याचे म्हटले आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचे पूर्वेकडील गव्हर्नर थिओ कासी (Theo Kasi) यांनी सांगितले की, बुशुशु (Bushushu) आणि न्यामुकुबी (Nyamukubi) गावात मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे गुरुवारी नद्या ओसंडून वाहू लागल्या. पाऊस इतका मुसळधार होता की, ज्यामुळे पुढच्या काहीच वेळात परिसरातील ओढे, नदी, नाले ओसंडून वाहून लागले. त्यांना महापूर आला. महापुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसले. ही घटना इतक्या वेगाने घडली की, नागरिकांना स्वत:चा निटसा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही. (हेही वाचा, World War II Ship Found: तब्बल 80 वर्षांनी सापडले दुसऱ्या महायुद्धातील जहाज; घ्या जाणून)

थिओ कासी यांनी पुढे बोलताना सांगितले की, मृतांची संख्या 176 वर पोहोचली आहे. अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी मृतदेह आढळून येत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, अधिकृत सूत्रांचा दाखला देत वत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्ताचा हवाला देऊन दिलेल्या वृत्तात अनेक प्रसारमाद्यमांनी म्हटले आहे की, डीआरसी येथील मृतांची संख्या 227 इतकी झाली आहे.

ट्विट

दरम्यान, डीआरसीमधील पूरग्रस्तांवर उपचार आणि मदत करणाऱ्या डॉक्टर रॉबर्ट मासांबा यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्यामुळे जीव वाचू शकलेले आणि जखमी झालेले लोक गुरुवारपासून (संध्याकाळ) उपचारासाठी दाखल होत आहेत. आतापर्यत आम्ही जवळपास 100 च्या वर जखमींवर उपचार केले आहेत. जे जवळपास 80% हून अधिक मोठ्या प्रमाणावर जखमी आहेत.

ट्विट

डीआरसीचे राष्ट्राध्यक्ष फेलिक्स त्शिसेकेडी यांनी ट्विट करून पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. फेलिक्स अँटोइन त्शिसेकेडी यांनी म्हटले की, 3 ते 4 मे 2023 या कालावधीत, कालेहे (दक्षिण किवु) प्रांतातील बुशूशू आणि मिनोव्हा येथे झालेल्या मुसळधार पावसात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून वाई वाटते. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जखमींना लवकर आराम पडो. तसेच, कुटुंबीय गमावलेल्यांना निर्धाराने उभे राहण्याचे बळ मिळो असेही फेलिक्स यांनी म्हटले आहे.